103 किलो वजनाच्या फरदीन खानने थेट 25 किलो वजन कसं कमी केलं? साखर नाही,सर्वात आधी सोडल्या या 2 गोष्टी
बॉलिवूड अभिनेता फरदीन खानने 103 किलो वजनापासून 25 किलो वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्याने हे 25 किलो वजन कमी करण्यासाठी कोणतेही कठोर डाएट किंवा फॅन्सी वर्कआउटचा अवलंब केला नाही, तर त्याने सुरुवातीला 2 गोष्टी सोडल्या अन् हळूहळू फरक दिसू लागला.

बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून ओळख असलेला फरदीन खान मागे अनेक वर्ष बॉलिवूडपासून दूर होता. त्याचे अचानक वाढलेले 103 किलो वजन पाहून चाहते देखील अवाक् झाले होते. पण त्याने पुन्हा एकदा आपल्यावर काम केलं आणि थेट 25 किलो वजन कमी केलं. त्याचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्याने एका मुलाखतीत त्याच्या या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.
‘हाऊसफुल 5’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परतलेला अभिनेता फरदीन खानने अलीकडेच एका मुलाखतीत त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल खुलासा केला आहे. त्याने 25 किलो वजन कमी करण्याबद्दल सांगितलं तसेच त्याने त्याच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात नक्की कोणत्या गोष्टी सोडल्या त्याही सांगितलं.
फरदीन खानचा वजन कमी करण्याचा प्रवास
फरदीन खानचा वजन कमी करण्याचा प्रवास त्याच्या चाहत्यांसाठी एक प्रेरणादायी कथा बनला आहे.बराच काळ पडद्यापासून दूर राहिल्यानंतर, तो संजय लीला भन्साळींच्या ‘ हीरामंडी’ सीरिज मधून पुन्हा अभिनयात परतला आणि चाहत्यांना त्याच्या लूकमधील बदल लक्षात आला. गेल्या काही वर्षांत त्याने जवळजवळ 25 किलो वजन कमी केले.
तेव्हा मी 102-103 किलो होतो
त्याने सांगितले की, “माझे वजन वाढले तेव्हा मी 102-103 किलो होतो. शरीरातील फॅट वाढले होते… मी आता 78 -79 आहे. जवळजवळ 25 किलो वजन मी कमी केलं आहे,” त्याने हे देखील कबूल केले की, “माझे वजन वाढले होते तेव्हा मला स्वतःला फरदीन खानसारखे अजिबात वाटत नव्हते”.
याआधी देखील एकामुलाखतीत त्याने त्याच्या वजन कमी करण्याबद्दल उघडपणे सांगितले होते. त्याने खुलासा केला होता की त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. तो म्हणाला की, “त्या वेळी मी जगभरात ट्रेंडिंग विषय होतो आणि पण योग्य कारणांसाठी नाही.”
या दोन गोष्टी सोडणे महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला
फरदीनने सांगितले की त्याच्या वजन कमी होण्याच्या प्रवासात दोन गोष्टी त्याने सोडल्यावर जास्त फरक जाणवू लागला त्या गोष्टी म्हणजे दारू आणि सिगारेट.फरदीन खानने सांगितले की त्याने 2020 मध्ये दारू पिणे सोडले. तो म्हणाला की, “2020 च्या सुरुवातीला मी शांत होतो. तेव्हाच कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान मी ही सवय पूर्णपणे सोडून दिली. मी एकाच वेळी ती सोडली.”
त्याने पुढे सांगितले की “मला 60 वर्षांचा झाल्यावर रक्ताळल्यासारखे वाटत होते. पण आता मला स्वच्छ, शांत वाटतंय…दारूसोबतच मी एका रात्रीतूनच धूम्रपान सोडलं, पण मला माझ्या नवीन आयुष्याशी जुळवून घेणे हा देखील एक कठीण प्रवास होता,” असंही त्याने सांगितले.
View this post on Instagram
कोणताही अतिरेकी डाएट नाही तर….
यो दोन गोष्टी सोडण्यासोबतच फरदीनने कोणताही अतिरेकी डाएट किंवा फॅन्सी ट्रेनिंग पद्धत वापरली नाही. त्याने नियमित व्यायाम सुरू केला, त्यासोबत वेळेवर झोप आणि संतुलित आहार या तिन्ही बाबतीत शिस्त पाळली. तो दिवसाला आठ तास झोप घेण्यावर भर देऊ लागला. फास्ट फूड, साखर, आणि अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स यांना बऱ्यापैकी त्याने कमी केले . तो अधिक पौष्टिक, नैसर्गिक अन्नपदार्थ घेऊ लागला. या सवयींसोबतच त्याने स्वतःचा स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशनलाही स्थान दिलं. त्यामुळे आज फरदीन कमबॅक सोबतच त्याचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन चर्चेचा विषय बनला आहे.
