AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA मध्ये हार… मेस्सी ढसाढसा रडला; महानायक अमिताभ बच्चन यांनी दिला धीर; ट्विटमध्ये काय म्हटलं?

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी फीफा वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सान्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी मेस्सीसाठी खास संदेश दिला आहे.

FIFA मध्ये हार... मेस्सी ढसाढसा रडला; महानायक अमिताभ बच्चन यांनी दिला धीर; ट्विटमध्ये काय म्हटलं?
| Updated on: Jul 20, 2026 | 5:04 PM
Share

फुटबॉल विश्वातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या फिफा वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यानंतर अर्जेंटिनाचा पराभव झाल्याची चर्चा रंगत असताना, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी लिओनेल मेस्सीसाठी भावनिक संदेश शेअर केला आहे. स्पेनने अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा पराभव करून विजेतेपद पटकावल्याचे सांगितले जात असून, त्यानंतर मेस्सी अत्यंत भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांनी मेस्सीचे मनोबल वाढवणारी पोस्ट केली आहे.

अमिताभ बच्चन हे क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही खेळांचे चाहते आहेत. मात्र, एका वैयक्तिक समजुतीमुळे ते क्रिकेटचे सामने पाहणे टाळतात तर फुटबॉलचे सामने आवर्जून पाहतात. अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील अंतिम सामना पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून मेस्सीला धीर देण्याचा प्रयत्न केला.

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टमध्ये काय?

‘आता सामना संपला आहे. स्पेन विजेता ठरला आणि मेस्सीचा पराभव झाला. तो दुःखी आहे, त्याच्या डोळ्यांत अश्रू आहेत. पण प्रत्येक महान खेळाडूचा एक दिवस असतो. आजूबाजूला पाहिल्यावर नेहमीच आपल्यापेक्षा सरस कोणी ना कोणी दिसतो. लोकांकडून मिळणारे प्रेम स्वीकारा. बाकी सर्व त्याचीच कृपा आहे.’ त्यांच्या या संदेशाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, अनेक चाहत्यांनीही मेस्सीला पाठिंबा दर्शवला आहे.

अंतिम सामन्यात स्पेनची बाजी

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनावर मात करत पुरुष फुटबॉल विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्याचे सांगितले जात आहे. सामन्यातील एकमेव गोल फेरान टोरेस याने केला आणि तोच सामन्याचा नायक ठरला.

अर्जेंटिनाने यापूर्वी तीन वेळा विश्वचषक जिंकला असून, 2022 मध्ये लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद पटकावले होते. मात्र, या वेळी अंतिम फेरीत पराभव झाल्याने चौथ्यांदा विश्वविजेते होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची चर्चा आहे.

अमिताभ बच्चन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, अमिताभ बच्चन लवकरच त्यांच्या लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ च्या 18व्या पर्वासह छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहेत. नुकतीच त्यांनी नव्या पर्वाची घोषणा केली असून, याबाबत ते उत्सुक असल्याचे दिसून आले.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा