कलाविश्वाला मोठा धक्का… प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Feb 20, 2023 | 12:16 PM

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटींवर दुःखाचा डोंगर.. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख केलं व्यक्त... सध्या त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ

कलाविश्वाला मोठा धक्का... प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Follow us on

SK Bhagavan Death : साऊथ सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक एसके भगवान (SK Bhagavan) यांचं निधन झालं आहे. एसके भगवान यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिग्दर्शक एसके भगवान यांचं बंगळुरू याठिकाणी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. एसके भगवान यांच्या निधनामुळे सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी एसके भगवान यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एसके भगवान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

कर्नाटक येथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिग्दर्शक एसके भगवान (SK Bhagavan) यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केलं आहे. बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत. ते ट्विट करत म्हणाले, ‘सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक एसके भगवान यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर प्रचंड दुःख झालं… मी प्रार्थना करतो या कठीण काळाचा सामना करण्यासाठी देव त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो…’ सध्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई याचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाले, ‘दोराई-भगवान यांच्या जोडीने सिनेविश्वाला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘कस्तूरी निवास’, ‘एराडू सोयम’, ‘बयालू दारी’, ‘गिरि कान्ये’, ‘होसा लेकुक’ यांसोबतच ५५ सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.’ सध्या सर्वत्र एसके भगवान यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

एसके भगवान यांचा जन्म ५ जुलै १९३३ रोजी झाला होता. एसके भगवान यांचं शिक्षण देखील बंगळुरू याठिकाणी झालं. एसके भगवान यांनी त्यांच्या करियरची सुरुवात रंगमंचापासून केली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. एसके भगवान यांनी प्रभाकर शास्त्री यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं .

एसके भगवान यांनी ‘भाग्योदय’ सिनेमात सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली. एसके भगवान यांचा ‘भाग्योदय’ हा पहिला सिनेमा होता. त्यानंतर ‘संध्यारागा’ सिनेमातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून करियरची सुरुवात केली. आज त्यांच्या निधनानंतर कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही.