
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. जया बच्चन यांनी बॉलिवूडच्या हीट चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्यांचे बऱ्याचदा रागावतानाचे आणि चिडतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. हेच नाही तर काही दिवसांपूर्वी एक वयस्कर महिला चाहती जया बच्चन याच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, जया बच्चन यांनी सर्वांसमोर झापले. पापाराझी यांच्यावर कायमच जया बच्चन भडकताना दिसतात. हेच नाही तर पापाराझी दिसले की, त्यांचा पारा इतका चढतो की, तुम्हाला कोणी बोलावले? घाणेरडे लोक असे शब्द त्यांच्या तोंडातून कायमच पापाराझी यांच्यासाठी निघतात. नुकताच त्यांनी एका मुलाखतीमध्ये पापाराझी यांच्याबद्दल धक्कादायक विधान केले. मी मीडियाचा सन्मान करते पण पापाराझींचा नाही. मीडियासोबत माझे खास नाते आणि पापाराझी यांच्यासोबत अजिबात नाही.
या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी पापाराझी यांच्याबद्दल अनेक चुकीचे शब्द वापरली. त्यांनी पापाराझीबद्दल बोलताना थेट म्हटले की, जे लोक मोबाईल घेऊन फिरतात, त्यांना वाटते की, ते कोणाचेही फोटो काढू शकतात आणि काहीही विचारू शकतात. जया बच्चन यांनी पापाराझी यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केला जात आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी जया बच्चन यांच्यावर निशाना साधत त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
अशोक पंडीत यांनी म्हटले की, कोणत्याही प्रकारचे एग्रेसिव्ह कवरेजवर टीका करणे बरोबर आहे. पण एखाद्या कामालाच खाली दाखवणे अत्यंत चुकीचे आहे. असे करणे प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणात प्रतिष्ठित ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीला अजिबात शोभत नाही. पापाराझी यांच्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, ते अत्यंत मेहनती लोक आहेत. ते फक्त आणि फक्त त्यांचे काम करत आहेत.
बऱ्याचदा कलाकारांकडून आणि त्यांच्या पीआर टीमकडून त्यांना बोलावले जाते. जया बच्चन यांना पापाराझीचे कल्चर आवडत नसेल तर त्यांनी अगोदर स्वत:ला बघावे मग त्यांच्यावर राग काढावा. काही दिवसांपूर्वीही एका कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर पापाराझींना ओरडताना जया बच्चन या दिसल्या. त्यानंतर मुलगी श्वेता बच्चन हिने परिस्थिती सांभाळत जया बच्चन यांना गाडीत बसवले.