होळी सणासाठी असे शब्द! फराह खान वादाच्या भोवऱ्यात, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, व्हिडीओ व्हायरल

Farah Khan: होळीच्या सणावर टिप्पणी केल्याबद्दल फराह खान अडकली वादाच्या भोवऱ्यात, तिच्यावर धार्मिक भावनांचा अपमान केल्याबद्दल एफआयआर दाखल... नक्की म्हणाली तरी काय? घ्या जाणून... व्हिडीओ व्हायरल

होळी सणासाठी असे शब्द! फराह खान वादाच्या भोवऱ्यात, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Feb 22, 2025 | 9:15 AM

Farah Khan: बॉलिवूडची प्रसिद्ध फिल्ममेकर आणि कोरियोग्राफर फराह खान सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. होळी या सणावर अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे फराह हिच्यावर FIR दाखल करण्यात आला आहे. फराह विरोधात तक्रार दाखल करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही तर हिंदुस्तानी भाऊ आहे. हिंदुस्तानी भाऊ म्हणजे विकार पाठक याने फराह विरोधात तक्रार दाखल केली आहे.

20 फेब्रुवारी रोजी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या टेलिव्हिजन शोच्या एका भागादरम्यान फराहने केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांबद्दल कायदेशीर कारवाईची मागणी करत शुक्रवारी खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीत पाठकने दावा केला आहे की, फराह होळीच्या सणाला, ”छपरियों का त्यौहार’ असं सांगितलं आहे. होळा सणाबद्दल अपमानजनक शब्दांचा वापर केल्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत… असं देखील हिंदुस्तानी भाऊ म्हणाला.

 

 

काय म्हणाले वकील?

वकील देशमुख म्हणाले, ‘फराह खानच्या या कमेंटमुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अपमान झाला आहे. पवित्र सणाचे वर्णन करण्यासाठी छपरी हा शब्द वापरणे अयोग्य आहे आणि त्यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.”

वकील पुढे म्हणाले, ‘माझ्या अशिलाने म्हटलं आहे की, आरोपीने केवळ माझ्या वैयक्तिक धार्मिक भावना दुखावल्या नाहीत, तर मोठ्या प्रमाणात हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहे. बॉलीवूडच्या चित्रपट निर्मात्या आणि नृत्यदिग्दर्शिका, ज्यांनी हिंदू सण होळीबद्दल अत्यंत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यासाठी मी न्याय मागतो…’ आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सांगायचं झालं तर, सध्या सोशल मीडियावर फराह खान हिचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा फराह तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. याआधी देखील अनेकदा  फराह अडचणीत अडकली आहे.