.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणवीर सिंगचा ‘फिटनेस फंडा’ आला समोर; ओट्स, शिलाजीतसह आहारात बरच काही!

बॉलीवूड कलाकारांचे नेहमीच सर्वसामान्यांना आकर्षण असते. ते काय खातात, केव्हा उठतात, त्यांचा दिनक्रम काय असतो आदी अनेक प्रश्‍न असतात. परंतु यांचा कधीही उलगडा होत नाही. सामान्यांना याबाबतची प्रचंड उत्सुकता लागून असते. नुकतेच अभिनेता रणवीरने त्याचा डाएट प्लान आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

रणवीर सिंगचा ‘फिटनेस फंडा’ आला समोर; ओट्स, शिलाजीतसह आहारात बरच काही!
Ranveer Singh
| Edited By: sagar joshi | Updated on: Feb 16, 2022 | 9:54 PM
Share

सध्या बॉलीवूडमध्ये सर्वात आघाडीचा असलेला तसेच आपल्या हटके लूकमुळे नेहमी प्रसिध्दीत असलेला अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. रणवीर व दिपीका पदुकोन नेहमी आपल्या चाहत्यांसाठी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. फेसबूक, इस्टावर त्यांना लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळत असतात. रणवीरचा फीट (fitness) आणि फाईन लूक हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरत असतो. चाहत्यांसमोर येताना त्याचा लूक नेहमीच हटके असतो. त्यामुळे अगदी सर्वांच्याच नजरा त्याच्यावर खिळून असतात. आपली केशरचना, कपड्यांची ठेवन आदींच्या माध्यमातून रणवीर नेहमीच चर्चेत असतो. यासोबतच त्याच्या फिटनेसमुळेही अनेक तरुण (young) त्याला आपला आदर्श मानत असतात. तो केवळ चित्रपटातच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही उत्साहाने भरलेला दिसतो. प्रत्येकाला त्याच्यासारवखे बनण्याची इच्छा असते. पण तुम्हाला माहित आहे का त्याच्या फिटनेसचे रहस्य काय आहे?

‘आस्क मी एनिथिंग’ या कार्यक्रमादरम्यान रणवीर सिंगने त्याच्या फिटनेसची रहस्ये चाहत्यांसोबत शेअर केली. जेव्हा रणवीरला विचारण्यात आले की ‘तू नाश्त्यात काय खातोस, तेव्हा तो म्हणाला, ‘मी दिवसाची सुरुवात 130 ग्रॅम ओट्स, 15 ग्रॅम नट्स आणि 5 ग्रॅम चॉकलेट चिप्सने करतो.’ त्यानंतर रणवीरने सांगितले की तो सकाळी लवकर डिटॉक्स ड्रिंक तसेच प्रतिकारशक्ती वाढवणारे शॉट्स घेतो. हे सर्व केल्यानंतर, तो प्रोबायोटिक ड्रिंक आणि शिलाजित, अश्वगंधा आणि खजूराचे लाडू खातो.

काय आहे शिलाजीतचे फायदे?

शिलाजीत ‘टेस्टोस्टेरॉन’ वाढवण्याचे काम करते. शिलाजीत हे आयुर्वेदिक उपायांसाठी ओळखले जाते आणि शरीरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ते प्रभावी असल्याचे मानले जाते. शिलाजीत आणि अश्वगंधा दोन्ही मानसिक ताण-तणाव कमी करण्यास मदत करतात. दरम्यान, रणवीर लवकरच ‘सर्कस’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे.

संबंधित बातम्या

दागिन्यांच्या सुरक्षेसाठी होता स्वतंत्र माणूस, बप्पी दांच्या सोन्याचे पुढे काय होणार?

‘लॉकअप’च्या ट्रेलर लाँच आधी कंगना आणि एकता गुरुद्वाऱ्यात दर्शनाला, पाहा एक्सक्लुझिव्ह फोटो

बप्पी लाहिरी यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची रीघ, बप्पी दा यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर