AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉस स्पर्धकाला लग्नाचं आमिष, बलात्कार, अनेकदा अबॉर्शन, FIR दाखल

Bigg Boss : बिग बॉस फेम मॉडेलवर दुःखाचा डोंगर... लग्नाचं आमिष दाखवत बलात्कार, अनेकदा अबॉर्शन, सतत मारहाण... घटना थक्क करणारी, पोलिसांत FIR दाखल... पोलिसांकडून पुढील चौकशी सुरु

बिग बॉस स्पर्धकाला लग्नाचं आमिष, बलात्कार, अनेकदा अबॉर्शन,  FIR दाखल
| Updated on: Jan 31, 2024 | 3:29 PM
Share

नवी दिल्ली | 31 जानेवारी 2024 : राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिग बॉसच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली मॉडेल आणि अभिनेत्रीवर मित्राने बलात्कार केला आहे. अभिनेत्रीने मित्राविरोधात पोलिसांत FIR दाखल केली आहे. पीडित अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले आहेत. पीडित अभिनेत्रीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 2022 पासून पीडिता आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. 2023 मध्ये पीडिता दिल्लीत आल्यानंतर आरोपी म्हणाला, ‘माझ्या एका मित्राला तुला भेटायचं आहे… तो भेटण्यासाठी हट्ट करु लागला…’ अभिनेत्री बिग बॉस असल्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

पीडित अभिनेत्रीला जेव्हा आरोपी भेटण्यासाठी आला, तेव्हा त्याने प्रचंड सामान आणलं होतं. त्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ आणि पेय देखील होते. स्नॅक्स खाल्ल्यानंतर पीडित अभिनेत्रीची शुद्ध हरपली. पीडित अभिनेत्रीने अनेकदा नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

पीडित अभिनेत्री म्हणाली, आरोपी कायम लग्न करू असं म्हणायचा… एवढंच नाही तर, सतत लग्नाचं आमिष देत आरोपीने अभिनेत्रीचे न्यूड व्हिडीओ देखील शूट केले. पुढे जेव्हा पीडित अभिनेत्री आरोपीकडे लग्न करण्याची मागणी करायची तेव्हा तो अभिनेत्रीला न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा..

एवढंच नाही तर, पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत पीडित अभिनेत्रीने अनेकदा अबॉर्शन केल्याचं देखील कबूल केलं आहे. आरोपी अभिनेत्रीला सतत मारहाण देखील करायचा आणि पैसै घ्यायचा… अभिनेत्रीची तक्रार दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दिल्ली पोलिसांनी आरोपी तरुणाचा तपास सुरू केला आहे. पीडितेचे जबाब नोंदवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याआधारे कारवाई सुरू करण्यात आली आहे. सागंयाचं झालं तर, बिग बॉस लोकप्रिय शो आहे. नुकताच ‘बिग बॉस 17’ शोचा फिनाले पार पडला. अभिनेता सलमान खान याने मुनव्वर फारुकी याच्या नावाची घोषणा विजेता म्हणून केली. तर अभिनेता अभिषेक कुमार फर्स्ट रनरअप ठरला.. सध्या सर्वत्र बिग बॉस शो आणि शोमधील स्पर्धकांची चर्चा रंगली आहे.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.