‘गिगी इकडे’, ‘ए टॉमी’.. व्हिडीओमागील ‘देसी’ पापाराझींचा आवाज ऐकून तुम्हालाही हसू होईल अनावर!

एकाने गिगी हदिदला जणू मराठी भाषा समजत असल्याप्रमाणे 'गिगी दीदी इकडे इकडे' अशी हाक मारली. तर दुसरा पापाराझी जेव्हा झेंडायाला ओळखू शकत नाही, तेव्हा त्याच्या सहकाऱ्याला ती कोण आहे असं विचारतो. त्यावर 'टॉम की गर्लफ्रेंड है भाई' असं उत्तर ऐकायला मिळतं.

'गिगी इकडे', 'ए टॉमी'.. व्हिडीओमागील 'देसी' पापाराझींचा आवाज ऐकून तुम्हालाही हसू होईल अनावर!
व्हिडीओमागील 'देसी' पापाराझींचा आवाज ऐकून तुम्हालाही हसू होईल अनावर!Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 10:50 AM

मुंबई : गेल्या काही वर्षांत बॉलिवूड इंडस्ट्रीत ‘पापाराझी कल्चर’ खूप वाढलंय. हे पापाराझी सेलिब्रिटींचा पाठलाग करत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ क्लिक करून सोशल मीडियावर अपलोड करतात. गुरुवारपासून या पापाराझींची चांगलीच धावाधाव सुरू आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी देशभरातील सेलिब्रिटींसोबतच परदेशातील नामांकित कलाकार उपस्थित होते. त्यामुळे मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून ते या कल्चरल सेंटरपर्यंत पापाराझींची धावाधाव सुरू होती. हे सेलिब्रिटी दिसले की त्यांचं लक्ष कॅमेराकडे वेधणं हे पापाराझींसाठी मोठं आव्हान असतं. झेंडाया, टॉम होलँड, गिगी हदिद, पेनेलोप क्रूझ यांसारख्या सेलिब्रिटींचं लक्ष वेधण्यासाठी पापाराझींनी जे केलं, ते पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर होतंय.

सध्या सोशल मीडियावर पापाराझींचे हे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटींचे व्हिडीओ शूट करताना बॅकग्राऊंडमध्ये पापाराझींचा आवाज ऐकायला मिळतोय. यामध्ये काहीजण हॉलिवूड सेलिब्रिटींना मराठीत हाक मारताना दिसत आहेत. तर काही जणू बालमित्र असल्याप्रमाणेच या सेलिब्रिटींना बोलावताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

‘इकडे इकडे उजवीकडे’

एकाने गिगी हदिदला जणू मराठी भाषा समजत असल्याप्रमाणे ‘गिगी दीदी इकडे इकडे’ अशी हाक मारली. तर दुसरा पापाराझी जेव्हा झेंडायाला ओळखू शकत नाही, तेव्हा त्याच्या सहकाऱ्याला ती कोण आहे असं विचारतो. त्यावर ‘टॉम की गर्लफ्रेंड है भाई’ असं उत्तर ऐकायला मिळतं. एअरपोर्टजवळ एक पापाराझी ‘स्पायडर मॅन’ फेम टॉम होलँडला ‘टॉम, ए टॉमी’ अशी हाक मारताना दिसत आहे.

‘टॉम, ए टॉमी….’

या व्हायरल व्हिडीओवरून नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण पोट धरून हसत आहेत, तर काहींनी पापाराझींच्या वागण्यावर टीका केली आहे. ‘ही भारतासाठी शरमेची बाब आहे’, असं काहींनी म्हटलंय. ‘मी कधी कल्पनासुद्धा केली नव्हती की असं काही होईल’, असंही एका युजरने लिहिलं आहे.

कल्चरल सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या या सेलिब्रिटींचा अत्यंत ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला गिगी हदिद आणि झेंडाया यांनी मॉडर्न अंदाजात साडी नेसली होती. त्यांच्या या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं.

Non Stop LIVE Update
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल
'दिवार'मधील 'तो' डायलॉग म्हणत चतुर्वेदींकडून शिंदेंवर पुन्हा हल्लाबोल.
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
कॅमेरा सोमय्या शायनिंग.., होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले.
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?
बारामतीचे EVM पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये अन् 45 मिनिटं CCTV बंद?.
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा
'लाव रे तो व्हिडीओ' रिटर्न... राज ठाकरेंचा सुषमा अंधारेंवर निशाणा.
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?
पुणे, शिरूर आणि मावळमध्ये 50 टक्क्यांच्या आत मतदान; धाकधूक कोणला?.
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.