
सेलिब्रिटींना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी, कोणत्या तरी कार्यक्रमात अनेकदा चांगल्यासोबतच वाईट अनुभवही येतात. त्यांच्यासोबत अशा काही घटना घडतात की त्याची कल्पनाही कधी त्यांनी केली नसेल. अनेकदा सेलिब्रिटींसोबत गर्दीत गैरप्रकारही घडतात. एवढंच नाही तर काही कलाकारांनी एकमेकांमध्ये असलेल्या वादात असे कृत्य केलं आहे. त्यात फक्त अभिनेत्री नाही तर अभिनेत्यांचाही समावेश आहे. असे अनेक कालाकार आहे ज्यांना गर्दीत, कार्यक्रमात अज्ञात व्यक्तींनी मारलं आहे किंवा कानशिलात लगावली आहे. असे कोण सेलिब्रिटी आहेत ज्यांच्यासोबत हे भयानक प्रसंग घडले आहेत जाणून घेऊयात.
गौहर खान
“इंडियाज रॉ स्टार” च्या अंतिम फेरीच्या लाईव्ह शूटिंग दरम्यान एका प्रेक्षकने गौहर खानला थप्पड म्हणजे कानशि
लात लगावली होती. त्या माणसाला वाटले की गौहर खान लहान कपडे घालून त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा अनादर करत आहे.
रणवीर सिंग
2022 च्या SIIMA अवॉर्ड्समध्ये रणवीर सिंगला त्याच्याच अंगरक्षकाकडून एक चापट बसली होती. रेड कार्पेटवरील गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असताना, गार्डचा हात अभिनेत्याच्या गालावरही बसला होता. रणवीरने मात्र तो प्रसंग गांभीर्याने घेतला नाही.
कंगना राणौत
2024 मध्ये अभिनेत्री-राजकारणी कंगना राणौत दिल्लीला जाणाऱ्या UK707 फ्लाइटने प्रवास करत होती. चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणीनंतर बोर्डिंगकडे जात असताना, एका महिला CISF कॉन्स्टेबलने तिला थप्पड मारली. घटनेनंतर लगेचच, कंगनासोबत प्रवास करणाऱ्या मयंक
मधुरनेही कॉन्स्टेबलला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला.
ANI नुसार, कंगनाला थप्पड मारणाऱ्या CISF कॉन्स्टेबलने सांगितले की तिची आई आता रद्द झालेल्या कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांच्या निदर्शनात सहभागी होत आहे. ती म्हणाली “शेतकरी 100 रुपयांसाठी तिथे बसले आहेत. ती तिथे बसेल का? कंगनाने ते विधान केले तेव्हा माझी आई आंदोलनात होती…”
बिपाशा बसू
2001 मध्ये, “अजनबी” च्या सेटवर करीना कपूर आणि बिपाशा बसू यांच्यात झालेला वाद सर्वांना माहित आहे. करीनाच्या डिझायनरने बिपाशाला तिच्या परवानगीशिवाय मदत केली होती, ज्यामुळे जोरदार वाद झाला होता. या वादात करीनाने बिपाशाला “काळी मांजर” म्हटले आणि तिला कानशीलात मारली होती.
करण सिंग ग्रोव्हर
करण सिंग ग्रोव्हरला त्याच्या टीव्ही शोच्या सेटवर त्याची तत्कालीन पत्नी जेनिफर विंगेटने थप्पड मारल्याचा आरोप आहे. अहवालांनुसार जेनिफरला करणचे विवाहबाह्य संबंध कळले होते, ज्यामुळे ती संतापली होती.
सलमान खान
2009 मध्ये, दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या मुलीने सलमान खानच्या खाजगी पार्टीत घुसून त्याला थप्पड मारल्याचा आरोप आहे. एका वृत्तानुसार, मुलगी दारूच्या नशेत होती. पार्टीत हा सर्व गोंधळ झाला त्यानंतरही सलमान शांत राहिला आणि त्याच्या अंगरक्षकांनी तिला बाहेर काढल्याचं म्हटलं जातं.
अमृता राव
अमृता रावला तिच्या “प्यारे मोहन” चित्रपटाच्या सेटवर ईशा देओलने थप्पड मारल्याचा आरोप आहे. ईशाने नंतर एका मुलाखतीत या घटनेची पुष्टी केली आणि म्हटले की अमृताच्या असभ्य वागण्यामुळे तिला असे करण्यास भाग पाडले होते.