25 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याला भारतात मिळालेली 100 टक्के ओपनिंग, धुरंधर पेक्षाही जास्त होती पाहण्यासाठी क्रेझ

25 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याला भारतात मिळालेली मोठ्या प्रमाणात ओपनिंग. चित्रपटातील अभिनेत्री म्हणाली धुरंधर आणि धुरंधर 2 पेक्षा देखील जास्त लोकांनी पाहिलेला चित्रपट.

25 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्याला भारतात मिळालेली 100 टक्के ओपनिंग, धुरंधर पेक्षाही जास्त होती पाहण्यासाठी क्रेझ
| Updated on: Jun 13, 2026 | 4:00 PM

Gadar : दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा सुपरहिट चित्रपट गदर: एक प्रेम कथा 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झाला होता. भारताच्या चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या चित्रपटाला आता 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने अभिनेत्री अमीषा पटेलने चित्रपटाशी संबंधित अनेक खास आठवणींना उजाळा दिला.

एका विशेष मुलाखतीत बोलताना अमीषा पटेलने सांगितले की, ‘गदर’मुळे त्यांना केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येही मोठा चाहतावर्ग मिळाला. विशेषतः तिने साकारलेल्या ‘सकीना’ या पात्राने दोन्ही देशांतील प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.

पाकिस्तानमधील चाहत्यांची भावनिक प्रतिक्रिया

अमीषा पटेलने सांगितले की, ‘गदर’ प्रदर्शित झाल्यानंतर तिला पाकिस्तानमधून अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. एका प्रसंगाची आठवण सांगताना ती म्हणाली की, एका वृद्ध महिलेने तिच्या सचिवांमार्फत तिच्याशी संपर्क साधला होता. त्या महिलेने फोनवर सांगितले, अमीषा जी, तुम्ही संपूर्ण पाकिस्तानला रडवले. ‘सकीना’ने आमच्या भावना हेलावून टाकल्या.

यानंतर त्या महिलेच्या कुटुंबीयांनीही संपर्क साधून आपल्या मुलीचे नाव ‘सकीना’ ठेवल्याचे सांगितले. चित्रपट आणि पात्राबद्दल पाकिस्तानातील प्रेक्षकांच्या मनात असलेले प्रेम पाहून आपण भारावून गेल्याचे अमीषाने नमूद केले.

25 वर्षांनंतरही कायम आहे ‘गदर’ची जादू

अमीषा पटेलच्या मते, 25 वर्षांनंतरही ‘गदर’ची लोकप्रियता तशीच कायम आहे. विशेष म्हणजे 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर 2 नेदेखील बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. ती म्हणाली की, ‘गदर’ आणि ‘गदर 2’ या दोन्ही चित्रपटांनी मिळून प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत विक्रमी कामगिरी केली आहे. लाखो प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पाहिला आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

प्रदर्शनानंतर तब्बल 25 वर्षे उलटून गेली असली तरी ‘गदर: एक प्रेम कथा’ आणि त्यातील तारा सिंह-सकीना यांची प्रेमकथा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात तितक्याच ताकदीने जिवंत आहे. देशभक्ती, प्रेम, त्याग आणि भावनिक नात्यांचा संगम असलेल्या या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीत एक वेगळाच इतिहास रचला आहे. आजही लोक या चित्रपटाचे काही भाग फ्रीमध्ये सोशल मीडियावर बघताना दिसतात.

Follow Us