AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonia Sehrawat: CJP आंदोलकांना झुरळ म्हणून हिणवणाऱ्या RAF अधिकारी सोनिया यांचा पगार किती; कशी मिळते नोकरी?

Sonia Sehrawat: 20 जुलै रोजी दिल्लीत झालेल्या आंदोलनानंतर RAF अधिकारी सोनिया सेहरावत चर्चेच्या केंद्रबिंदू ठरल्या. आता त्यांचा पगार किती आहे आणि या क्षेत्रात नोकरी कशी मिळते? याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

Sonia Sehrawat: CJP आंदोलकांना झुरळ म्हणून हिणवणाऱ्या RAF अधिकारी सोनिया यांचा पगार किती; कशी मिळते नोकरी?
Sonia Sehrawat
| Updated on: Jul 24, 2026 | 2:36 PM
Share

Sonia Sehrawat: 20 जुलै पासून सुरु असलेल्या आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या अधिकारी सोनिया सेहरावत चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. आंदोलनादरम्यान, जखमी झाल्यानंतर सोनिया यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. एवढंच नाही तर, दोन दिवसांनंतर त्यांनी सोशल मीडियावर देखील एक पोस्ट शेअर केली. सोनिया यांच्या पोस्टनंतर सर्वत्र खळबळ माजली. सोनिया सेहरावत या सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या (CRPF) ‘रॅपिड ॲक्शन फोर्स’ (RAF) मध्ये असिस्टंट कमांडंट आहेत. मूळच्या हरियाणातील असलेल्या सोनिया यांनी UPSC CAPF परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर CRPF मध्ये नोकरी मिळवलं. तर चर्चेत आलेल्या सोनिया सेहरावत यांचा पगार किती आहे आणि RAF मध्ये नोकरी कशी मिळवता येते, याबद्दल सविस्तर जाणून ध्या

जंतर – मंतर प्रदर्शनानंतर सोनिया सहरावत चर्चेत…

रिपोर्टनुसार, सोनिया सेहरावत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. पण त्यांनी ती पोस्ट लगेचच डिलिट देखील केली. स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, CAN’T FIX THEMSELVES AND THEY WANNA FIX THE COUNTRY…, सोनिया सहरावत यांनी पोस्ट डिलिट केली असली तरी, स्क्रिनशॉट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. यावर CJP ने प्रत्युत्तर देखील दिलं. ‘झुरळ कधी मरच नाहीत…’, असं ट्विट सीजेपीने केलं.

RAF मध्ये असिस्टंट कमांडंट कसे होता येते?

RAF मध्ये असिस्टंट कमांडंटच्या पदासाठी कोणतीही स्वतंत्र थेट भरती प्रक्रिया नाही; त्याऐवजी, उमेदवारांना ‘युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन’ (UPSC) द्वारे घेतल्या जाणाऱ्या CAPF असिस्टंट कमांडंट परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागतं. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती CRPF सह विविध ‘सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस’मध्ये (CAPF) केली जाते. या भरती प्रक्रियेत तीन टप्पे असतात: लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी व वैद्यकीय तपासणी, आणि मुलाखत किंवा व्यक्तिमत्त्व चाचणी देखील होते. त्यानंतर मेरिटच्या आधारावर उमेदवारांची नियुक्ती केली जाते.

RAF साठी पात्रता?

CAPF असिस्टंट कमांडंट परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणं आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवार भारतीय नागरिक असणं आणि वय 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाते आणि उमेदवारांनी शारीरिक व वैद्यकीय निकष पूर्ण करणंही आवश्यक असतं.

किती मिळतो पगार?

सातव्या वेतन आयोगांतर्गत, सीआरपीएफ CRPF मधील Assistant Commandant हे पद ‘गट-अ’ अधिकारी दर्जाचं मानलं जातं. याचं वेतन ‘पे लेव्हल 10’ नुसार निश्चित केलं जातं आणि ते दरमहा 67,700 ते 2,08,700 या श्रेणीत असतं. मूळ वेतनाव्यतिरिक्त, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता यांसारखे भत्ते तसेच इतर सरकारी लाभही त्यांना दिले जातात.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच