AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पेपर फोडणाऱ्यांचं काही खरं नाही, पेपरफुटी दुरुस्ती विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; होणार तब्बल इतक्या वर्षांची शिक्षा, दहा कोटींचा दंड

नीट पेपर फुटी प्रकरणात गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जतंर मंतर मैदावर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. अखेर पेपरफुटी दुरुस्ती विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे.

आता पेपर फोडणाऱ्यांचं काही खरं नाही, पेपरफुटी दुरुस्ती विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; होणार तब्बल इतक्या वर्षांची शिक्षा, दहा कोटींचा दंड
पंतप्रधान नरेंद्र मोदी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 24, 2026 | 3:24 PM
Share

नीट परीक्षेचा पेपर फुटला होता, या घटनेमुळे सध्या देशभरात वातावरण ढवळून निघालं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्लीमधील जंतर मंतरवर कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. अखरे पेपरफुटी दुरुस्ती विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. पेपरफुटी दुरुस्ती विधेयकानुसार आता अशा प्रकरणामध्ये तब्बल दहा वर्षांची शिक्षा तसेच दहा कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची मिटिंग पार पडली. यावेळी पेपर लिक दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. या विधेयकात पेपर लीक माफियांना कठोर शिक्षा सुनावण्याची तरतूद करण्यात आली आहे. पेपर लीक प्रकरणाचा खटला स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असून लीगल बॅकिंग देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात तीन महिन्यांत सुनावणी करून निर्णय देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तर, पेपर लीक प्रकरणात 10 वर्षाची शिक्षा आणि 10 कोटीच्या आर्थिक दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. पेपर लीक दुरुस्ती विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार आहे. तसेच सोमवारी हे विधेयक सभागृहात मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे.

27 जुलै रोजी विधेयक येणार

सरकारच्या म्हणण्यानुसार, कायदा बनवून कोर्ट स्थापन करण्यात येणार आहे. पेपर लीक प्रकरणाची सुनावणी जास्तीत जास्त तीन महिन्यात करण्यात येणार आहे. येत्या 27 जुलै रोजी सभागृहात हे विधेयक मांडलं जाणार आहे. शुक्रवारी दोन्ही सभागृहात नीट पेपरफुटी प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज रविवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. दरम्यान आता या पेपर लीक दुरुस्ती विधेयकामुळे अशा घटनांना चाप बसण्याची शक्यता आहे.  देशभरात सध्या नीट पेपर फुटी प्रकरणावरून वातावरण तापलेलं असतानाच सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 27 जुलै रोजी हे विधेयक सभागृहात मांडलं जाणार आहे.

Follow Us
पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा...
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
Abhijeet Dipke | आज आम्हाला अटक होऊ शकते, पण.... अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले?
आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच रद्द?
Delhi Police News | विद्यार्थी आंदोलनाने सरकारची चिंता वाढली; दिल्ली पोलिसांच्या सुट्ट्याच केल्या रद्द, नवा आदेश काय?
हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
Varsha Gaikwad | मुंबई पोलिसाकडून महिला आंदोलकाशी गैरवर्तन? हा शिवरायांचा महाराष्ट्र नाही! वर्षा गायकवाड यांचा संताप
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
Phaltan Car Accident | साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
Varun Dhavan On Students Protest | विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! अभिनेता वरुण धवनची पोस्ट व्हायरल
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
26 दिवसांचं उपोषण संपलं! सोनम वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Sanjay Raut | सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं पण... ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
PM Modi On NEET | पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट आणि कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर आजच चर्चा होणार