AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashes Test मालिकेतील एक सामना भारतात खेळणार? बीबीएलनंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सामन्याची चर्चा

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील एशेज कसोटी मालिका जगप्रसिद्ध आहे. या दोन संघात गेल्या अनेक दशकांपासून ही मालिका सुरू आहे. आतापर्यंत 100हून अधिक सामने खेळले गेले आहेत. दोन्ही देशात आलटून पालटून सामने होत असतात. आता 150 वा सामना भारतात आयोजित करण्याची शक्यता आहे.

Ashes Test मालिकेतील एक सामना भारतात खेळणार? बीबीएलनंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सामन्याची चर्चा
Ashes Test मालिकेतील एक सामना भारतात खेळणार? बीबीएलनंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सामन्याची चर्चाImage Credit source: TV9 Network/File
| Updated on: Jul 24, 2026 | 3:27 PM
Share

भारतात क्रिकेट हा सर्वात मोठा खेळ गणला जातो. गेल्या काही वर्षात भारतातील क्रिकेटची प्रसिद्धी आणखी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक देश भारतात येऊन क्रिकेट खेळण्यासाठी आग्रही आहे. इतकंच काय भारताला यजमानपद भूषवण्यातही रस आहे. पण आता भारतात वेगवेगळ्या संघाचे सामने आयोजित करण्याबाबतही चर्चा सुरू आहेत. तुम्ही वाचलं ते अगदी बरोबर आहे. भारतीय मैदानात इतर संघ सामने खेळण्यास उत्सुक आहेत. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग स्पर्धेबाबत निर्णय झाला आहे. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आणखी एक पाऊल पुढे टाकत भारतात एशेज मालिकेतील एक सामना आयोजित करण्यासाठी आग्रही आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील द्वंद्व भारतात पाहण्याची संधी मिळणार आहे.

इंग्लंड ऑस्ट्रेलिया एशेज मालिका

क्रिकेट इतिहासातील सर्वात जुनं आणि प्रसिद्ध द्वंद्व एशेज मालिकेच्या रुपाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका सुरू आहे. पण ही मालिका आलटून पालटून दोन्ही देशात खेळली जाते. पण आता क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये एका वेगळा विचार केला जात आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी एक प्रस्ताव ठेवून खळबळ उडवून दिली आहे. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ग्रीनबर्ग यांनी सांगितलं की, एशेज मालिकेत प्रत्येक पैलूंवर विचार करण्याची तयारी आहे. यात भारतात एशेज मालिकेत एक सामना खेळवण्याचा विचार देखील आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यातील दृढ संबंधांचा उल्लेख करत ग्रीनबर्ग म्हणाले की, भारतात गुंतवणुकीची चांगली संधी आहे आणि आम्ही यावर विचार करण्यास तयार आहोत.

बिग बॅश लीगनंतर कसोटी क्रिकेटमध्ये क्रांती

ऐतिहासिक एशेज स्पर्धेच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पुढील वर्षी मार्चमध्ये एकच कसोटी सामना खेळवला जाणार आहे. तसं पाहिलं तर हा सामना काही ऑस्ट्रेलिया बाहेर खेळवण्यााच विचार नाही. पण भविष्यात एखादा सामना भारतात खेळवला जाण्यावर विचार केला जाऊ शकतो, असं ग्रीनबर्ग म्हणाले. या सामन्यासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाची सहमती असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेतील पहिला सामना भारतात आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. हा सामना चेन्नईत खेळला जाणार आहे.

Follow Us
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय