AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झिम्बाब्वेविरुद्ध हरारेमध्ये वैभव सूर्यवंशीने चौकार-षटकार का मारले? स्वत:च केला खुलासा

वैभव सूर्यवंशीची बॅट काही इंग्लंडमध्ये चालली नाही. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यात काय करतो? याकडे लक्ष होतं. अखेर पहिल्याच सामन्यात त्याने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना इंगा दाखवला. वैभव सूर्यवंशीने 19 चेंडूत 50 धावांची खेळी केली. पण या आक्रमक खेळीचं गुपित त्याने सामन्यानंतर उघड केलं.

झिम्बाब्वेविरुद्ध हरारेमध्ये वैभव सूर्यवंशीने चौकार-षटकार का मारले? स्वत:च केला खुलासा
झिम्बाब्वेविरुद्ध हरारेमध्ये वैभव सूर्यवंशीने चौकार-षटकार का मारले? स्वत:च केला मोठा खुलासाImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jul 24, 2026 | 2:28 PM
Share

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयात सर्वात मोठं योगदान राहिलं ते वैभव सूर्यवंशीचं.. वैभव सूर्यवंशीने या सामन्यातील पहिल्या तीन चेंडूवर संयम दाखवला. पण चौथ्या चेंडूनंतर आपल्या भात्यातून चौकार आणि षटकार काढले आणि झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. वैभव सूर्यवंशीने या कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या अर्धशतकाची नोंद केली. वैभवने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि 19व्या चेंडूवर बाद होत तंबूत परतला. पण आक्रमक खेळीचं वर्णन करताना वैभव म्हणाला की, हरारेच्या मैदानात उतरल्यानंतरच धावा करेन अशी जाणीव झाली होती. तसंच या सामन्यात घडलं देखील.. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक आई वडील आणि प्रशिक्षकांना समर्पित केलं आहे. चला जाणून घेऊयात या आक्रमक खेळीनंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला ते…

वैभव सूर्यवंशी म्हणाला की…

वैभव सूर्यवंशीने आपल्या अर्धशतकी खेळीचं विश्लेषण करताना सांगितलं की, ‘क्रिकेट कारकिर्दीच्या सुरूवातीच्या सामन्यात अशी खेळी केल्याने पुढच्या सामन्यांसाठी आत्मविश्वास आणखी दुणावतो. या सामन्यात मी पूर्णपणे एकाग्र होतो आणि मला माझ्या सामर्थ्यावर पू्र्ण विश्वास होता. मी झालं पहिलं अर्धशतक हे माझ्या कुटुंबाला, प्रशिक्षकांना आणि या प्रवासात मला साथ देणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करतो.’ वैभव सूर्यवंशीने पुढे सांगितलं की, ‘हरारेचं मैदान मला खूप आवडतं आणि काही मैदानं अशी आहेत की तुम्हाला लगेच भावतात. मी जिथे कुठे खेळतो, तिथे चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असतो. संघासाठी योगदान देणं आणि सर्वोत्तम करणं हे माझं काम आहे.’

वैभव सूर्यवंशीच्या नावावर विक्रमाची नोंद

वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वेविरुद्ध अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्याने कामगिरी दरम्याने चार षटकार आणि चार चौकार मारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरूण खेळाडू म्हणून त्याला मान मिळाला आहे. इतकंच काय तर कमी वयात जलद अर्धशतकी खेळीचा विक्रमही त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे.

Follow Us
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं आमिष दाखवलं की...
पुन्हा नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून लोकांची फसवणूक, असलं विचित्र आमिष दाखवलं की पीडित...
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब