
मुंबई : 18 सप्टेंबर 2023 | दरवर्षी प्रमाणे अभिनेत्री शिल्पा शिट्टी बाप्पाचं मोठ्या थाटात स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री गणरायाला घेवून स्वतःच्या घरी पोहोचली आहे. शिल्पा अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जे गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करतात. शिल्पा स्वतः तिच्या गणपतीला वर्कशॉपमधून न्यायला जाते. यंदाच्या वर्षी देखील अभिनेत्री बाप्पाला घरी घेवून जाण्यासाठी वर्कशॉपमध्ये पोहोचली. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील आनंदी वातावरण सर्वांना आवडलं… पण सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त शिल्पा हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्यावर येवून थांबल्या..
गणेश चतुर्थीच्या आधी गणपतीची मूर्ती आणण्यासाठी शिल्पा शेट्टी तिच्या संपूर्ण टीमसह वर्कशॉपमध्ये पोहोचली. यावेळी शिल्पाच्या संपूर्ण टीमचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मात्र आनंदाच्या वातावरणात एक गोष्ट नेटकऱ्यांना खटकली. बप्पाला आपल्या घरी घेवून जाण्यासाठी राज कुंद्रा देखील पत्नीसोबत वर्कशॉपमध्ये पोहोचला होता.
गणपतींना घरी घवून जात असताना देखील राज कुंद्रा याने स्वतःचा चेहरा लपवला होता. म्हणून शिल्पाच्या पतीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘असं काम करा ज्यामुळे चार लोकांना तोंड दाखवू शकू…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘शिल्पाच्या पतीचा विनोद झाला आहे. तरी देखील अभिनेत्री पतीसोबत गर्वाने फिरते… शेम शेम शेम…’, आणखी एक नेटकरी कमेंट करत म्हणतो, ‘पूजेसाठी तरी तोंड दाखवायचं… असं काय केलं ज्यामुळे तोंड लपवावं लागत आहे…’ सध्या सर्वत्र राज कुंद्रा याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टीची मुलगी समिषा वडिलांचा चेहऱ्यावरील हुडी हटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. वडील आणि लेकीचा व्हिडीओ फार क्यूट आहे. पण यावर देखील अनेकांनी निशाणा साधला आहे. ‘लेक मोठी झाल्यानंतर कळेल वडील चेहरा का लपवत होते…’ सध्या सर्वत्र राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.