Karan Johar याच्या मुलांना ऐकावे लागायचे टोमणे, ‘त्या’ घटनेवर दिग्दर्शकाने सोडलं मौन
Karan Johar | 'मला काहीही बोला, पण माझ्या मुलांना....', चिमुकल्या मुलांना टोमणे ऐकावे लागत असल्यामुळे करण जोहर याने घेतला महत्त्वाचा निर्णय... वयाच्या पाचव्या वर्षी करण जोहर याच्या जुळ्या मुलांना अनेक टोमणे ऐकावे लागले... अखेर दिग्दर्शक म्हणाला...

मुंबई : 18 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि गॉडफादर करण जोहर याने अनेक सिनेमांचं दिग्दर्शन केलं. करण याने दिग्दर्शित केलेले सिनेमे फक्त हीट नाही तर सुपरहीट ठरले. करण याच्या सिनेमाने प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. पण करण जोहर याचं खासगी आयुष्य मात्र कायम चर्चेत राहिलं. आजही करण त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. दरम्यान, काही वर्षांपूर्वी करण जोहर याने सेरोगसीच्या माध्यामातून जुळ्या मुलांचं जगात स्वागत केलं आणि करण मुलगा यश आणि मुलगी रुही यांचा बाबा झाला. पण करण याने लग्नापू्र्वी बाबा होण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं. करण याच्या मुलांना अनेक वाईट गोष्टी आणि टोमणे ऐकावे लागले. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त करण जोहर यांच्या मुलांची चर्चा असायची.
अनेक वर्षांनंतर करण जोहरने अखेर ट्विटर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोडण्याचे खरे कारण उघड केलं. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, करण याने उघड केले की त्याने आपल्या मुलांबद्दल यश आणि रुहीबद्दल अनेक अपमानास्पद गोष्टी वाचल्यानंतर दिग्दर्शकाने ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला होता. सध्या सर्वत्र करण जोहर याची चर्चा रंगली आहे.
करण जोहर याने सोडलं मौन
करण जोहरने एका मुलाखतीत खुलासा केला की, ट्विटरवर अपमानास्पद गोष्टी वाचल्यानंतर दिग्दर्शकाला वाईट वाटत होतं. ‘मला वाईट बोला… तुम्हाला वाटेल ते बोला…त्यांनी माझ्या आईशीही गैरवर्तन केले. माझी आई वृद्ध आहे. मी ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझी मुले पाच वर्षांची होती.’
पुढे करण म्हणाला, ‘मला ट्विटरचं महत्त्व कळलं आहे. पण मला या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर नाही रहायचं. मी माझ्या मुलांबद्दल काही वाईट ऐकू शकत नाही… या सगळ्या गोष्टी बघून ऐकून, फक्त आई – वडील म्हणून नाही तर, एक व्यक्ती म्हणून देखील माझ्या भावनांना ठेच लागली आहे…’ असं देखील करण म्हणाला.
नेपोटिझमच्या दाव्यांमुळे आपण ट्विटर सोडले नसल्याचे करणने स्पष्ट केले. “असं नाही की मी इंडस्ट्रीतील लोकांना कास्ट करणं थांबवलं आहे. मी कोणाचंही ऐकलं नाही. ते माझ्या मुलांबद्दल होतं. मी ते वाचू शकलो नाही. पालक असलेल्या कोणालाही कळेल की हा एक प्रकार आहे जो तुम्ही स्वीकारु शकणार नाही. तुम्ही काहीही सहन करु शकाल पण, मुलांविरोधात कोणीच काहीही खपवून घेवू शकत नाही…’ असं देखील करण यावेळी म्हणाला.
