Shubman Gill : शुबमनसाठी 2026 वर्ष निर्णायक, प्रिन्सचा कस लागणार, युवा फलंदाजासमोर असंख्य आव्हानं
Team India Shubman Gill 2026 : शुबमन गिल याने टीम इंडियासाठी 2025 वर्षात क्वचित अपवाद वगळता जबरदस्त कामगिरी केली. मात्र शुबमनसाठी 2026 हे वर्ष प्रचंड आव्हानात्मक असणार आहे. जाणून घ्या भारताच्या प्रिन्ससमोर काय आव्हानं असणार.

भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) अपवाद वगळता 2025 या वर्षात अफलातून कामगिरी केली. त्यानंतर आता भारतीय संघ कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्वात 2026 वर्षातील पहिलीवहिली तसेच एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध (India vs New Zealand Odi Series) या मालिकेत 3 सामने खेळणार आहे. भारतीय संघाने नववर्षाची विजयाने सुरुवात करुन मालिकेत आघाडी घ्यावी, अशी चाहत्यांना आशा असणार आहे. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघाच्या कामगिरीकडे चाहत्यांची करडी नजर असणार आहे. शुबमनसाठी कर्णधार आणि फलंदाज म्हणून हे वर्ष अनेक अर्थाने आव्हानात्मक असणार आहे. शुबमनसमोर या वर्षात नक्की काय आव्हानं असणार? हे सविस्तर जाणून घेऊयात. मात्र त्याआधी शुबमनने 2025 या वर्षात काय कमावलं आणि काय गमावलं? हे पाहूयात. ...
