इराणने मानले थेट भारताचे आभार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट, चीन आणि पाकिस्तानही..
अमेरिका आणि इराणमधील तणाव सध्या प्रचंड वाढला आहे. अनेक विमान कंपन्यांनी या तणावात थेट इराणमधील विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भारत थेट इराणच्या मागे भक्कमपणे उभा राहिल्याचे बघायला मिळाले.

इराणमधील परिस्थितीवर जगाच्या नजरा आहेत. इराणमधील सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले असून मोठा आक्रोश आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला अमेरिकेने पाठिंबा दिला, हे आंदोलन अधिक चिघळताना दिसले. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही बाहेरील लोकांचा हस्तक्षेप सहन करणार नसल्याचे इराणने स्पष्ट केले. अमेरिकेकडून इराणला धमक्या देण्यात आल्या. त्या धमक्यांना त्याच भाषेत उत्तर इरानने दिले. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते, असे सांगितले जात आहे. अमेरिकेने तशी पूर्ण तयारीही केली आहे. मात्र, इराणनने स्पष्ट केले की, अमेरिकेने आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण जगाला याचा परिणाम भोगावा लागेल. आम्ही जगाला नष्ट करू, अशी धमकी इराणने दिली. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उठू शकतो.
सरकारविरोधी निदर्शनांवर इराणने केलेल्या कारवाईचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ठरावाविरुद्ध भारताने शुक्रवारी मतदान केले. थेट भारत इराणच्या बाजूने उभा राहिल्याचे बघायला मिळाले. NO मतदान भारताने केले. अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारताने इराणच्या बाजूने मतदान केले. भारतासोबतच चीन आणि पाकिस्तानही इराणच्या बाजूने उभे होते.
असा हा पहिल्याच प्रस्ताव असावा, जिथे भारत, चीन आणि पाकिस्तान एकाच बाजूने दिसले. आता भारताने इराणची साथ दिल्याने इराणनने भारताचे आभार मानले आहेत. भारत आणि इराणमध्ये अनेक वर्षांपासून मजबूत संबंध आहेत. इराणमध्ये स्थिती सध्या वाईट आहे, यादरम्यान भारत इराणच्या बाजूने उभा आहे. नवी दिल्लीतील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी मानवाधिकार परिषदेच्या ठरावाविरुद्ध मतदान केल्याबद्दल भारताचे थेट आभार मानले आहेत.
अमेरिका चाबहार बंदरावरील बंदी पुन्हा लादणार असताना भारताने इराणविरुद्धच्या ठरावाच्या विरोधात मतदान केले आहे. हा अमेरिकेसाठी मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे. भारताने थेट अमेरिकेसह अनेक देशांविरोधात भूमिका घेतली आहे. अमेरिके इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असून इराणला आपल्या हातात घेण्याची तयारी अमेरिकेची आहे.
