AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री पंकजा मुंडे, हिटमॅन रोहित शर्मा यांच्यासह सहा जणांना मानद डॉक्टरेट

पुणे येथील अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने आयोजित १० व्या दीक्षांत समारंभात मंत्री पकंजा मुंडे आणि भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आदींना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

मंत्री पंकजा मुंडे, हिटमॅन रोहित शर्मा यांच्यासह सहा जणांना मानद डॉक्टरेट
Minister Pankaja Munde and Rohit Sharma
| Updated on: Jan 24, 2026 | 9:24 PM
Share

पुणे – मला पीएचडी मिळावी अशी खूप इच्छा होती आणि त्याच वेळेस मला पीएचडी मिळाली आहे. सामाजिक क्षेत्रात मला पीएचडी मिळाली आहे यासाठी डी.वाय.पाटील विद्यापीठाचे आभार अशी प्रतिक्रीया मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. अनेक लोकांना त्यांनी डॉक्टरेट दिली आहे, जसं की आपला सर्वांचा लाडका क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि अनेक विद्यमान,गुणवानांना ही पदवी मिळाली आहे, माझंही भाग्य मलाही त्यांनी पीएचडी दिली आहे असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

यावेळी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी मराठीत बोलु का.? मातृभाषा का राष्ट्रभाषा ? ज्यांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांची भाषा.कुठल्या भाषेत बोलू चला मी खिचडीत बोलते. मला पीएचडीची खूप इच्छा होती आणि त्याच वेळेस मला पीएचडी मिळाली आहे.सामाजिक क्षेत्रात मला पीएचडी मिळाली आहे. त्या पुढे म्हणाल्या की,’ जे तुम्हाला बनायचं ते बना. पण लोकांनी जसं तुम्हाला ट्रीट करावं वाटतं, तसं तुम्ही बना.पैसे कमवल्याने आपला इगो सॅटिस्फाय होतो. पण आनंद व्यक्ती बना.आनंदी व्यक्ती बनवायचं असेल आणि आनंदी करायचं असेल तर पॉझिटिव्ह राहायला शिका.ऐकावे जनाचे करावे मनाचे. मी विद्यापीठाचे आभार मानते.’

मंत्री पंकजा मुंडे यांना अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ (ADYPU) ची डॉक्टरेट पदवी मिळाली आहे.अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्यावतीने क्रिकेटर रोहित शर्मा यालाही डॉक्टरेट पदवी देऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे. अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचा (ADYPU) १० दीक्षांत समारंभ शनिवारी एडीवायपीयू कॅम्पस, डी.वाय. पाटील नॉलेज सिटी, चरहोली बीके, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा यालाही मानद डॉक्टरेट (डी. लिट.) प्रदान करण्यात आली. या समारंभाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री विद्या माळवदे यांनी केले.

यांना डॉक्टरेट मिळाली

रोहित शर्मा ( क्रिकेट ), उज्जैनचे आदरणीय गुरुजी प्रमोद शर्मा ( सेवा ), मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे ( सामाजिक कार्य ),सनातन धर्म फाऊंडेशनचे संस्थापक सुदेश अग्रवाल ( सांस्कृतिक ), गोल्डियम इंटरनॅशनल लिमिटेडचे ​​कार्यकारी अध्यक्ष रेशेश भन्साळी (औद्योगिक नेतृत्व ), सामाजिक उद्योजक, तंत्रज्ञ आणि धोरणात्मक सल्लागार मनोज पोचट (उद्योग ) आदींना मानद डॉक्टरेट देऊन सन्मान करण्यात आला.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?