AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन नव्हे ‘सोन्याची खाण’! स्मार्टफोनच्या कोणत्या भागांत लपलेलं असतं सोनं-चांदी ?

स्मार्टफोनमध्ये ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, तांबे, सोने, चांदी, लिथियम आणि नियोडिमियमसारखे विविध धातू वापरले जातात. हे धातू फोनला मजबूत, हलके आणि टिकाऊ बनवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. बॉडीसाठी ॲल्युमिनियम-मॅग्नेशियम, सर्किटसाठी तांबे-सोने आणि बॅटरीसाठी लिथियम वापरले जाते. यामुळे तुमचा फोन वर्षानुवर्षे कार्यक्षम राहतो.

फोन नव्हे ‘सोन्याची खाण’! स्मार्टफोनच्या कोणत्या भागांत लपलेलं असतं सोनं-चांदी ?
स्मार्टफोनमध्ये कोणते धातू वापरले जातात ?Image Credit source: chatgpt
| Updated on: Jan 23, 2026 | 1:08 PM
Share

आजच्या रकाळात मोबाईल, तोही स्मार्टफोन माहीत नाही, तो वापरत नाही असे लोक विरळच. लहानांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांच्या हातात स्मार्टफोन दिसतो. पण आपला हाच फोन ‘स्मार्ट’ बनवण्यासाठी फक्त फीचर्स आणि सॉफ्टवेअर यांचा हात नसतो तर तो फोन बारीक, मजबूत पण तितकाच (वजनाने) हलका बनवण्यासाठी धातूंचाही चेवढाच महत्वाचा हात असतो. आपण रोज जो स्मार्टफोन वापरतो त्यामध्ये कोणते धातू वापरले जातात आणि कोणत्या भागात कोणता धातू असतो हे तुम्हाला माहिती आहे का? एक फोन बनवण्यासाठी ती कंपनी कोणकोणता धातू वापरते याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

स्मार्टफोनच्या बॉडीमध्ये कोणता धातू वापरला जातो ?

जेव्हा तुम्ही हातात फोन धरता तेव्हा तो खूप हलका वाटतो. त्यामध्ये इतके पार्ट्स असूनही आपल्यावा फोन जड का वाटत नाही याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागे मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम हे दोन धातू आहेत. फोनमध्ये वापरलेली ॲल्युमिनियम फ्रेम ही हँडसेटला ताकद देते, तर दुसरीकडे, मॅग्नेशियम हा धातू आपला फोन हलका ठेवण्यास मदत करते. तर आपल्याकडे असलेल्या फोनमधील सपोर्ट आणि स्क्रूसारख्या भागांसाठी स्टीलचा वापर केला जातो.

सर्किट आणि बॅटरीमध्ये कोणत्या धातूंचा वापर ?

एखाद्या स्मार्टफोनमध्ये वापरलेला सर्किट बोर्ड तांब्याचा बनलेला असतो. तसेच त्यामध्ये सोने आणि चांदीचे पातळ थरही वापरले जातात. त्यामध्ये सोन्याचा वापर केला जातो कारण सोनं हाँ असा धातू आहे की तो कधीच गंजत नाही. त्यामुळेच मोबाईल फोन वर्षानुवर्षे टिकाऊ राहतात. बॅटरीमध्ये लिथियमचा (Lithium) वापर मुख्य धातू म्हणून केला जातो.

स्पीकरमध्ये या धातूचा वापर

तर आपल्या स्मार्टफोनच्या स्पीकरमध्ये कोणता धातू वापरला जातो, याची तरी तुम्हाला कल्पना आहे का ? नियोडिमियम हाँ एक असा धातू आहे, ज्याचा वापर छोटं मॅग्नेट बनवण्यासाठी केला जातो आणि त्याचा वापर स्पीकर तसेच व्हायब्रेशन मोटरमध्येही केला जातो.

पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.