AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election News LIVE : धाराशिवमध्ये शिवसेनेच्या दोन गटात राडा

| Edited By: | Updated on: Jan 25, 2026 | 10:16 PM
Share

BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : मुंबई महापौर पदाचा पेच सुटणार? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज संभाव्य बैठक होण्याची शक्यता असून, मुंबईसह राज्यातील सत्ता समीकरणांवर चर्चा होणार आहे.

Maharashtra Election News LIVE : धाराशिवमध्ये शिवसेनेच्या दोन गटात राडा
breaking news

मुंबई महानगरपालिकेवर भगवा कोणाचा फडकणार आणि राज्याचा प्रथम नागरिक होण्याचा मान कोणाला मिळणार, याचा फैसला आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज वर्षा निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य बैठकीत मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमधील सत्तास्थापनेच्या सूत्रावर चर्चा होऊ शकते. मुंबईतील संख्याबळाची जुळवाजुळव, मित्रपक्षांची भूमिका आणि अपक्षांना सोबत घेण्याची रणनीती यावर दोन्ही नेते शिक्कामोर्तब करण्याची चिन्हे आहेत. महायुतीचा महापौर बसवण्यासाठी जागावाटपाचा कोणता फॉर्म्युला ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Jan 2026 08:56 PM (IST)

    चाळीसगाव तालुक्यातील टाकळीमध्ये नायलॉनच्या मांजामुळे चिरला दुचाकीस्वाराचा गळा

    चाळीसगाव तालुक्यातील टाकळीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून, नायलॉनच्या मांजामुळे दुचाकीस्वार तरुणाचा गळा चिरला आहे. दिनेश पाटील असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • 25 Jan 2026 08:33 PM (IST)

    प्रजासत्ताक दिनी अरबी समुद्रात तिरंगा ध्वज फडकणार

    प्रजासत्ताक दिनी अरबी समुद्रात तिरंगा ध्वज फडकणार

    तिरंगा रंगात शेकडो नौका ध्वजाला देणार मानवंदना

    एकाच वेळी शेकडो बोटींचे भोंगे वाजविले जाणार

    देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

  • 25 Jan 2026 08:26 PM (IST)

    परभणीमधून तीन तोळ्यांच्या राणीहाराची चोरी

    परभणीमधून तीन तोळ्यांच्या राणीहाराची चोरी

    हातचलाखीने लांबवला 3 तोळ्यांचा राणीहार

    चोरी करतांना महिला सीसीटीव्हीत कैद

    परभणीमधील धक्कादायक प्रकार

  • 25 Jan 2026 08:18 PM (IST)

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

    राजू शेट्टी यांचे खंदे आणि विश्वासू समर्थक महेश खराडेंचा पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश

    सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश

    महेश खराडेंच्या भाजपा प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा हादरा

  • 25 Jan 2026 06:55 PM (IST)

    बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार

    बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.डिसेंबर महिन्यात त्यांचं निधन झालं होते. त्याच सोबत लोक प्रबंधन क्षेत्रात के. टी. थॉमस यांना, केरळच्या एन. राजम यांना कला क्षेत्रात तर उत्तर प्रदेशातील पी. नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात तर केरळच्या व्ही. एस. अच्युतानंदन (मरणोत्तर) पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

  • 25 Jan 2026 06:31 PM (IST)

    धाराशिवमध्ये शिवसेनेच्या दोन गटात राडा

    धाराशिवमध्ये शिवसेनेच्या दोन गटात राडा झाला असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत  दोन गटात राडा झाला आहे. शिवसेनेचे अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात बाचाबाची झाली असून शिवसेनेतील कथित ऑडिओ क्लिपनंतर प्रचंड गोंधळ झाला आहे.

  • 25 Jan 2026 06:24 PM (IST)

    नाशिक – आदिवासी शेतकरी आंदोलक उद्या मुंबईच्या दिशेने येणार

    विविध प्रलंबित मागण्यांसाठी हजारो आदिवासी शेतकरी पायी चालत मुंबईच्या दिशेने निघाले आहे.आज नाशिक शहराबाहेर राजुर बहुला येथे त्यांचा मुक्काम असून त्यानंतर उद्या पुन्हा मुंबईच्या दिशेने होणार रवाना आहे.

  • 25 Jan 2026 05:53 PM (IST)

    प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी युरोपीय नेते दिल्लीत दाखल

    युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो लुईस सॅंटोस दा कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांना विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आणि औपचारिक स्वागत करण्यात आले. ते 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे आहेत.

  • 25 Jan 2026 05:43 PM (IST)

    राजन साळवी यांची बदनामी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होणार

    ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांची बदनामी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होणार आहे. शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणात थेट भूमिका घेतली आहे. बदनामी करणारे शिवसेना पदाधिकारी अविनाश खापे यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बदनामी कदापि सहन केली जाणार नाही, शिस्तभंगाची ठोस कारवाई होईल,असं सरनाईकांनी स्पष्ट केलं आहे.

  • 25 Jan 2026 05:28 PM (IST)

    कल्याण–डोंबिवलीत ठाकरे गटाचे 4 नगरसेवक बेपत्ता; आता कुटुंबीयही नॉट-रिचेबल

    टीव्ही 9 मराठीची टीम मधुर म्हात्रे यांच्या घरी पोहोचली होती. तेव्हा ठाकरे गटाचे नॉट रिचेबल असलेले नगरसेवक मधुर म्हात्रेंचे आई-वडील व कुटुंबीयही आठवडाभरापासून घराबाहेर असल्याची माहिती आहे. तर कल्याण पश्चिमेतील नगरसेविका स्वप्नाली केणे यांचे पती विनोद केणेही बेपत्ता आहेत. नगरसेवकांचा शोध घेण्यासाठी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाने लेखी तक्रार केली आहे.  संजय राऊत यांच्या आदेशानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे.  कल्याण पूर्वेत पोस्टर लावून शोध मोहीम सुरु झाली आहे.

  • 25 Jan 2026 05:20 PM (IST)

    मालाड स्थानकात लोकलमधील वादातून प्रवाशाची हत्या, 30 तारखेपर्यंत कोठडी

    मालाड स्थानकात लोकलमधील वादातून प्रवाशाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एनएम कॉलेजचे प्राध्यापक आलोक सिंग यांची धारदार शस्त्राने हत्या केली. आरोपीला हत्येप्रकरणी 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • 25 Jan 2026 05:15 PM (IST)

    नांदेडमध्ये ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाचं आयोजन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना

    गुरू तेग बहादूरांनी धर्म वाचवण्यासाठी बलिदान दिलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी लढत राहिले. हिंद-दी-चादर कार्यक्रमाद्वारे सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं. गुरू गोविंदसिंह यांनी मोठा काळ नांदेडमध्ये घालवला, असंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

  • 25 Jan 2026 04:55 PM (IST)

    कल्याण–डोंबिवलीच मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद पेटला, राजकीय वातावरण तापले

    डोंबिवलीत पालिका कारवाईने मराठी तरुणीला व्यवसायासाठी त्रास दिल्याचे समोर आले होते. मात्र कल्याण पूर्वेत परप्रांतीय फेरीवाल्यांना सूट दिल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता शिवसेना आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता कल्याण पूर्वेत भांडी खरेदीवरून वाद झाला आहे. मराठी ग्राहकांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप होत आहे, त्यामुळे कल्याण–डोंबिवलीतील वातावरण चांगलेच तापले आहे.

  • 25 Jan 2026 04:40 PM (IST)

    पनवेल : महायुतीच्या गटनेतेपदी नितीन पाटील यांची नियुक्ती

    पनवेल महानगरपालिका निवडणुकीत महायुती (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी) यांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर, सर्व नेत्यांनी एकमताने नितीन पाटील यांची गटनेतेपदी अधिकृत नियुक्ती केली आहे. महापालिकेतील विजयामुळे महायुतीच्या पुढील रणनीतीत नितीन पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

  • 25 Jan 2026 04:26 PM (IST)

    कोल्हापूर : निवडणूक भरारी पथकाकडून पाच लाखांच्या साड्या जप्त

    कोल्हापूरात निवडणूक भरारी पथकाकडून पाच लाखाच्या साड्या जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटण्यासाठी या साड्या आणल्याचा संशय आहे. करवीर तालुक्यातील वाशी गावात जावळाच्या कार्यक्रमावेळी भरारी पथकाने धाड टाकत ही कारवाई केली आहे.

  • 25 Jan 2026 04:13 PM (IST)

    बुलढाणा : खुल्या बाजारात सोयाबीन दर वाढल्याने नाफेड केंद्राकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

    काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर क्रमांकासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आता परिस्थिती उलट झाली असून, शासकीय खरेदी केंद्रांनाच शेतकर्‍यांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. बाजार समितीत सोयाबीनचे दर वाढल्याने जिल्ह्यातील अनेक शासकीय खरेदी केंद्रांगध्ये सोयाबीनची आवक सध्या बंद झाल्याचे समोर आले आहे.

  • 25 Jan 2026 04:02 PM (IST)

    नागपुरात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद, प्रतापनगर पोलिसांची कामगिरी

    नागपुरातील विविध भागात दुकानांचे शटर फोडून चोऱ्या करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात राणा प्रतापनगर पोलिसांना यश आले.या कारवाईमुळे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले. पोलिसांकडून 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच 3 आरोपींना अटक करण्यात आली.

  • 25 Jan 2026 03:49 PM (IST)

    वसई विरार महापालिकेचा महापौर-उपमहापौर 3 फेब्रुवारीला ठरणार

    वसई विरार महापालिकेचा महापौर-उपमहापौर 3 फेब्रुवारीला ठरणार आहे. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी 3 फेब्रुवारीला विशेष सभेचे आदेश काढले आहेत. पीठासिन अधिकारी म्हणून पालघरच्या जिल्हाधिकारी डूइंदू राणी जाखड यांची नियुक्ती केली आहे.

  • 25 Jan 2026 03:31 PM (IST)

    डोंबिवलीत लक्ष्मीनारायण इमारतीतील फ्लॅटला आग, जीवितहानी टळली

    डोंबिवली नामदेव पथालगत रस्त्याच्या बाजूला असलेल्या लक्ष्मीनारायण बिल्डिंगमधील एका फ्लॅटला आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. या आगीमुळे धुराचे मोठे लोट पाहायला मिळत आहेत. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यातआलंय.

  • 25 Jan 2026 03:06 PM (IST)

    परभणीत भाजप शिवसेनेची 2 विधानसभा मतदारसंघातील युती फिस्कटली

    परभणीत भाजप शिवसेनेची 2 विधानसभा मतदार संघातील झालेली युती फिस्कटली आहे. मनपा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा युती फिस्कटली आहे. जिंतूर आणि परभणी मतदारसंघातील 17 जागांवर युती झाली होती. संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युती झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र पिंगळी आणि बोबडे टाकळी गटात भाजपने एबी फॉर्म दिल्याने युती फिस्कटली. रात्री उशिरापर्यंत भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक निष्फळ ठरली. संपर्कप्रमुख आनंद जाधव आणि जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी ही माहिती दिलीय.

  • 25 Jan 2026 02:55 PM (IST)

    पाचुपतेवाडीत पुण्याच्या DRI विभागाची कारवाई

    कराड तालुक्यातील पाचुपतेवाडीत पुण्याच्या DRI विभागाने कारवाई केली आहे. ड्रग्स निर्मिती कारखान्यावर कारवाई केल्याची चर्चा  सुरु आहे. सातारा आणि कराड पोलिसही कारवाई बाबत अनभिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 25 Jan 2026 02:45 PM (IST)

    भुजबळ साहेब सत्यवादी आहेत- सुषमा अंधारे

    भाजपत लोकं जातात कारण भाजप उत्तमपणे निवडणूक मॅनेज करू शकते. निवडणूक, ईव्हीएम, साम दाम व्यवस्थित करू शकतात. भुजबळ साहेबांना क्लीन चीट दिलीय याचा अर्थ भुजबळ साहेब सत्यवादी आहेत असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

  • 25 Jan 2026 02:30 PM (IST)

    महाराष्ट्र हिरवा करू म्हणजे यांच्या बापाची जहागिरी आहे का? आमदार संजय केनेकर

    महाराष्ट्र हिरवा करू म्हणजे यांच्या बापाची जहागिरी आहे का? इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यावरून आमदार संजय केनेकरांचा घनघात. इम्तियाज जलील हा छत्रपती संभाजी नगर मध्ये लोकसभेला,आणि विधानसभेला चारही मुंड्या चीत झालेला आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा आहे, या देशाच्या भूमीचा आत्मा भगवा आहे असे संजय केनेकरां

  • 25 Jan 2026 02:15 PM (IST)

    वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

    कल्याण येथील दुर्गाडी चौक परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी विलास भागीत यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. रॉंग साईडने गाडी का घेऊन जात आहे जाब विचारल्याने चार तरुणांनी मारहाण केल्याची माहिती.

  • 25 Jan 2026 01:56 PM (IST)

    कल्याण–डोंबिवलीत ठाकरे गटाचे 4 नगरसेवक नॉट-रिचेबल

    कल्याण–डोंबिवलीत ठाकरे गटाचे 4 नगरसेवक नॉट-रिचेबल. नॉट-रिचेबल नगर सेवकाचे मधुर म्हात्रे याचे कुटुंबीय देखील आठवडाभरापासून घरात नसल्याची धक्कादायक माहिती. तर कल्याण पश्चिमेतील ठाकरे गटाच्या नगर सेविका स्वप्नाली केणे यांचे पती देखील गायब असल्याची माहिती. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 उमेदवार विजयी झालेले आहे यात आता पर्यंत चार नगरसेवक 16 तारखेपासून नॉट-रिचेबल आहेत.

  • 25 Jan 2026 01:45 PM (IST)

    मालाड रेल्वे स्थानकावर झालेल्या हत्येवर आलोक सिंगच्या कुटुंबाची प्रतिक्रिया

    कॉलेज प्रोफेसर आलोक सिंग यांच्या कुटुंबाने मालाड रेल्वे स्थानकावर झालेल्या त्यांच्या हत्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कॉलेज प्रोफेसर आलोक सिंग यांच्या एका नातेवाईकाने सांगितले की, आलोक सिंग हे एक साधे माणूस होते आणि सरकारी प्राध्यापक होते. आमची एकच मागणी आहे की आरोपींना लवकरात लवकर पकडले पाहिजे. हा प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे, रेल्वे स्थानकावर उघडपणे चाकूने वार करून पळून जात आहे आणि रेल्वे पोलिसांनी काहीही केले नाही. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना प्रथम निलंबित करण्याची मागणी होत आहे.

  • 25 Jan 2026 01:34 PM (IST)

    हिंगोली-ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने राज्य महामार्गावरील वाहन सेवा ठप्प

    हिंगोली-ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने राज्य महामार्गावरील वाहन सेवा ठप्प. राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा. वसमत -औंढा नागनाथ राज्य महामार्गावर वगरवाडी शिवारात ऊसाने भरलेला ट्रॅक्टर झाला पलटी. औंढानागनाथ येथून कपालेश्वर साखर करण्याकडे जात होता ट्रॅक्टर. जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टर हटवण्याचे काम सुरू.

  • 25 Jan 2026 01:11 PM (IST)

    नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे येथील रेमंड कंपनीजवळ कंटेनर पलटी

    नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे येथील रेमंड कंपनीजवळ कंटेनर पलटी. भर महामार्गावर कंटेनर झाला पलटी, वाहतूक संथ गतीने सुरू. अपघातात चालक जखमी, उपचारासाठी शासकीय रुग्णालयात केले दाखल. महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू.

  • 25 Jan 2026 01:00 PM (IST)

    नांदेडमध्ये शिवसेनेने महानगरपालिकेत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

    नांदेडमध्ये शिवसेनेने महानगरपालिकेत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. ताटाखालचं मांजर होण्याची इच्छा आहे अशा बांडगुळ आमदाराचा निषेध, अशी फेसबुक  पोस्ट लिहित शिवसेना जिल्हाप्रमुख विनय गिरडे पाटलांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःच्या मुलाला पद मिळवण्यासाठी आमदार कल्याणकर भाजपासोबत गेल्याचा आरोप जिल्हाप्रमुख गिरडेंनी केला आहे. पराभूत नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन गिरडे पाटील हे आमदार कल्याणकर यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार आहेत.

  • 25 Jan 2026 12:48 PM (IST)

    भाजपच्या झेंड्यातील खालचा हिरवा रंग हा एमआयएमचा आहे का, हे भाजपने सांगावं- अंधारे

    सोलापूर- “इम्तियाज भाईंबद्दल मला आदर आहे पण आता त्यांचं जे सुरू आहे त्यात मला एकही शब्द बोलायचं नाही. स्क्रिप्टेड गेम सुरू आहे त्यावर मला बोलायचं नाही. भाजप आणि एमआयएमची अचलपूरमधील युतीबाबत त्यांनी बोलावं. भाजपच्या झेंड्यातील खालचा हिरवा रंग हा एमआयएमचा आहे का हे भाजपने सांगावं,” असा सवाल सुषमा अंधारेंनी केला आहे.

  • 25 Jan 2026 12:36 PM (IST)

    भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आज धुळ्यात

    धुळे- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आज धुळ्यात आहेत. नवनिर्वाचित नगरसेविकांबरोबर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून महापालिकेच्या निवडणुकीनंतर चित्रा वाघ पहिल्यांदाच धुळ्यात आहेत.

  • 25 Jan 2026 12:24 PM (IST)

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नांदेड दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. शिखांचे नववे गुरु तेग बहाद्दूरजी यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त आयोजित हिंद दि चादर कार्यक्रमानिमित्त ते नांदेडला येणार होते. काही तांत्रिक कारणास्तव दौरा रद्द झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • 25 Jan 2026 12:12 PM (IST)

    भाजपात लोकं जातात कारण भाजप उत्तमपणे निवडणूक मॅनेज करू शकते- अंधारे

    “भाजपात लोकं जातात कारण भाजप उत्तमपणे निवडणूक मॅनेज करू शकते. निवडणूक, ईव्हीएम, साम दाम व्यवस्थित करू शकतात. भुजबळ साहेबांना क्लीन चीट दिली, याचा अर्थ भुजबळसाहेब सत्यवादी आहेत. त्यांच्यावर आरोप करणारा मुलुंड एचडी व्हिडीओ स्पेशालिस्टने भुजबळांची माफी मागितली पाहिजे. उलट त्यांच्यावर अब्रूनुकसानकीचा दावा भुजबळांनी दाखल केला पाहिजे. भावना गवळी, अजितदादा, हसन मुश्रीफ, यासह अनेक लोकांना क्लीन चीट मिळाली,” अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.

  • 25 Jan 2026 11:58 AM (IST)

    अंबादास दानवे यांचा इम्तियाज जलील यांना टोला

    हा महाराष्ट्र संत चोखोबा संत तुकाराम संत नामदेव महाराजांचा आहे, त्यामुळे महाराष्ट्र हिरवा करायचा ते कोणत्या अर्थाने बोलले हे मला माहिती नाही.परंतु हा महाराष्ट्राची भगवी पताका आज नाही तर वर्षानुवर्ष खांद्यावर घेऊन हा महाराष्ट्र सातत्याने भगवी पताका खांद्यावर घेत त्याच विचाराचा राहिलेला आहे त्यामुळे अशा बोलण्याला काही अर्थ नाही असा टोला अंबादास दानवे यांनी जलील यांना लगावला.

  • 25 Jan 2026 11:50 AM (IST)

    धाराशिव प्रकरणात राजन साळवी यांच्यावरील आरोप चुकीचे

    धाराशिवमध्ये मी प्रत्यक्ष भेट देणार आहे.नाराजी मुळीच नाही. राजन साळवी यांच्या बाबतीत चुकीचे आरोप होताय, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. महायुतीच्या जागावाटपाबाबत आरोप प्रत्यारोप होत राहतात. निवडणूक संपली आहे. याच बाबतीत चर्चा करत राहिले तर ३६५ दिवस कमी पडतील. आता चर्चा जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

  • 25 Jan 2026 11:40 AM (IST)

    परळी डेपोची प्रताप सरनाईकांकडून झाडाझडती

    परिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो पाहणीत एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेत आढळले. संबंधित चालक वाहकांवर तात्काळ कारवाई करण्याचे प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले.ब्रेथ अनालायझरने सर्व चालक वाहकांची तपासणी करण्याचे देखील प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले.प्रताप सरनाईक यांना चालक वाहकांच्या रेस्ट रूममध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या. तात्काळ चौकशी समिती नेमून या सर्व प्रकरणाची माहिती सादर करण्याचे प्रताप सरनाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.बस स्थानकात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याचे, गरज भासल्यास नवे सीसीटीव्ही तात्काळ विकत घेण्याचे प्रताप सरनाईक यांनी निर्देश दिले.

  • 25 Jan 2026 11:30 AM (IST)

    सरन्यायाधीश आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून राऊतांचा हल्लाबोल

    गेल्या साडेतीन वर्षापासून शिवसेना कोणाची हा खटला तीन वर्षांपासून टेबलावर आहे हे महाशय तारीख पे तारीख देत आहे या घटनाबाह्य शिंदे गटाने ४ निवडणुका लढले.काल जस्टिस सूर्यकांत मुंबईला उतरले प्रोटोकॉल नुसार त्या विभागाचे सचिव जायला हवे होते ते न जात राजकारणी काल त्यांच्या स्वागताला गेले. ज्यांचा खटला सुरू आहे त्यांच्याकडून सत्कार स्वीकारला हे अनैतिक आहे. ताज पॅलेस मध्ये भेट मिळावी म्हणून एकनाथ शिंदे हे तिथे बराच वेळ होते. हे जर असेच सुरू राहिले तर या न्यायव्यवस्थे वर उरला सुरला जो विश्वास आहे तो उडून जाईल. जस्टिस सूर्यकांत हे जर संविधानाचे पाहरेकरी असतील तर हे असे करू शकता. काल ते म्हणाले जस्टिस डिले इज़ जस्टिस डिनाय नॉट ओन्ली डिनॉय इज़ जस्टिस डिस्ट्रॉय हे तेच म्हणत आहे शिवसेना चा निर्णय अजून झाला नाही जस्टिस सूर्यकांत यांना राजकारणात यायचे आहे म्हणून हे सगळे करत आहे. न्यायव्यवस्था ही अमित शाहच्या (पायाखाली) अंगट्या खाली चिरडली जाईल, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला.

  • 25 Jan 2026 11:20 AM (IST)

    सोलापूरच्या माढ्यात दोन्ही राष्ट्रवादीतील युतीनंतर वाद विकोपाला

    सोलापूरच्या माढ्यात दोन्ही राष्ट्रवादीतील युतीनंतर वाद विकोपाला पोहचला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब साठेना मानेगावची उमेदवारी आमदार अभिजीत पाटील यांनी डावलली.उमेदवारी डावलल्याने माढ्यात आमदार अभिजीत पाटलांच्या विरोधात निषेध करणारे बॅनर लागले.उमेदवारी हवी असल्यास माढा नगरपंचायतची निवडणुक न लढविण्याची अट स्टॅम्प पेपरवर लिहुन देण्याची मागणी आमदार अभिजीत पाटलांनी केल्याचा आरोप दादासाहेब साठेनी केलाय.शरद पवारांसमोर विधानसभेला साठेनी दिलेला शब्द पाळला नाही.साठेनी विश्वासार्हता गमावलि आहे.त्यामुळे त्यांना स्टॅम्प वर लिहुन मागीतले असल्याचे आमदार पाटील यांनी स्प्षट केले आहे. स्टॅम्प पेपर वर लिहुन देण्याचा मागितलेला हा विषय राज्यभरात चर्चेचा ठरतो आहे.

  • 25 Jan 2026 11:10 AM (IST)

    सांगलीत राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त भव्य अशी जनजागृती रॅली

    सांगलीत आज राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त भव्य अशी जनजागृती रॅली काढण्यात आली. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत ही जनजागृती रॅली काढण्यात आली. या मतदार जनजागृती रॅलीमध्ये महाविद्यालयाचे तरुण तरुणी विद्यार्थी शिक्षक विविध सामाजिक संस्था यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मतदार दिवसा निमित्त जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सर्वांना मतदान करण्याची शपथ दिली. यानंतर सांगलीतील प्रमुख मार्गावरून मतदार जनजागृती रॅली काढत लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असा संदेश देण्यात आला. सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक विभागाकडून नीता शिंदे आणि अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे यांनी या रॅलीचे आयोजन केलं होतं.

  • 25 Jan 2026 11:00 AM (IST)

    पंढरपूर येथे होणाऱ्या माघीवारीनिमित्त सोलापुरात पहिले गोल रिंगण

    पंढरपूर येथे होणाऱ्या माघीवारीनिमित्त सोलापुरात पहिले गोल रिंगण पार पडले. माघीवारी निमित्त भगवे ध्वज घेत शेकडो वारकऱ्यांसह गोल रिंगण सोहळा संपन्न झाला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई यांची पालखी आल्यानंतर गोल रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. शहरातील नार्थकोट प्रशालेच्या प्रांगणामध्ये गोल रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गोल रिंगणासाठी मृदंग वादक, डोक्यावर तुळस घेऊन महिला भगिनींचा सहभाग पाहायला मिळाला. मागील 200 वर्षांपासून सोलापूर ते पंढरपूर माघवारी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येतेय.

  • 25 Jan 2026 10:50 AM (IST)

    नाशिकच्या सातपूर भागातील अशोक नगर भाजी मार्केट परिसरात भीषण अपघात

    गाडीच्या धडकेत मायले का सह तिघे जखमी. संताप्त जमावाकडून धडक देणाऱ्या कारची तोडफोड. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील तीन ते चार लोकांना दिली जोरदार धडक. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

  • 25 Jan 2026 10:40 AM (IST)

    पंढरपूर येथे होणाऱ्या माघीवारीनिमित्त सोलापुरात पहिले गोल रिंगण पार पडले

    माघीवारी निमित्त भगवे ध्वज घेत शेकडो वारकऱ्यांसह गोल रिंगण सोहळा संपन्न. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई यांची पालखी आल्यानंतर गोल रिंगण सोहळ्याला सुरवात. शहरातील नार्थकोट प्रशालेच्या प्रांगणामध्ये गोल रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गोल रिंगणासाठी मृदंग वादक, डोक्यावर तुळस घेऊन महिला भगिनींचा सहभाग पाहायला मिळाला

  • 25 Jan 2026 10:30 AM (IST)

    गुलाबराव पाटील नकली मंत्री- संजय राऊत

    गुलाबराव पाटील हे नकली मंत्री असल्याने अशी भाषा करतात म्हणत संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

  • 25 Jan 2026 10:20 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत जाहीर करावे- संजय राऊत

    बिहार भवनाला जागा देत आहोत, हे देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत जाहीर करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • 25 Jan 2026 10:05 AM (IST)

    जालन्यात 30 जानेवारीला होणार महापौराची निवड, भाजपाकडून 4 महिला नगरसेविकांची नावे वरिष्ठांकडे

    उपमहापौर आणि गटनेता पदासाठी जालन्यात रस्सीखेच होण्याची शक्यता,इच्छुकांकडून नेतेमंडळीकडे लॉबिंग करण्यास सुरुवात. महापौर पदाच्या आरक्षण सोडतीमुळे भास्कर दानवे आणि कैलास गोरंट्याल यांना फटका  नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर जालना महानगरपालिकेच्या पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आणि यामध्ये भाजपने 41 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. येत्या 30 जानेवारीला जालना महानगर पालिकेचा महापौर ठरणार आहे.

  • 25 Jan 2026 09:55 AM (IST)

    नागपुरात शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर; किशोर कुमरियांकडे महानगर प्रमुखपदाची धुरा

    नागपूर महानगरपालिका निवडणुकीतील पिछाडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर शहरात संघटनात्मक बदलांचे मोठे पाऊल उचलले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागपूरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, किशोर कुमरिया यांची महानगर प्रमुख पदी वर्णी लागली आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागल्याने आणि निवडणूक काळात तत्कालीन शहरप्रमुख नितीन तिवारी व किशोर कुमरिया यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने हे फेरबदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. संघटनेची पकड मजबूत करण्यासाठी शहराची विभागणी करत हरिभाऊ बानाईत, विक्रम राठोड आणि संदीप पटेल या तिघांची ‘शहरप्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या टीमसमोर आगामी काळात नागपूर शहरात शिवसेना पुन्हा उभारी देण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

  • 25 Jan 2026 09:45 AM (IST)

    नाशिक सिंहस्थ कुंभमेळा : मार्च २०२७ पूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करा; एकनाथ डवले यांचे कडक निर्देश

    नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रस्तावित असलेली सर्व विकासकामे मार्च २०२७ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी डवले यांनी विविध शासकीय यंत्रणांद्वारे सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पायाभूत सुविधा, रस्ते आणि नियोजित कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या बैठकीमुळे सिंहस्थ कामांच्या नियोजनाला आता अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

  • 25 Jan 2026 09:35 AM (IST)

    नाशिक महापालिकेत भाजपचं क्लीनअप ऑपरेशन; वादग्रस्त चेहऱ्यांना डच्चू, नव्या नेतृत्वाला संधी

    नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ७२ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने महापालिकेत ‘नवे नेतृत्व’ देण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी आणि कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी यावेळेस वादग्रस्त चेहऱ्यांना पूर्णपणे डावलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या नेत्यांमुळे किंवा कार्यकर्त्यांमुळे पक्षाची बदनामी झाली किंवा ज्यांनी पक्षात राहून चुकीची कामे केली, त्यांना महापौर, उपमहापौर किंवा स्थायी समिती सभापती यांसारख्या महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवले जाणार आहे. या संदर्भातील एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून तो प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. आगामी काळात नाशिकमध्ये भाजपचे नवे आणि निष्कलंक चेहरे महापालिकेची धुरा सांभाळताना दिसणार आहेत.

  • 25 Jan 2026 09:25 AM (IST)

    नागपूरचा नवा महापौर कोण, ४ फेब्रुवारीला होणार निवड; महिला नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू

    नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटल्याने आता या पदावर कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडीचा अधिकृत प्रस्ताव महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला असून, त्यांच्या स्वाक्षरीनंतर तो विभागीय आयुक्तांकडे पाठवला जाईल. प्राप्त माहितीनुसार, येत्या ४ फेब्रुवारी रोजी महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपमध्ये अनेक महिला नेत्यांनी या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून विविध नावांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

  • 25 Jan 2026 09:15 AM (IST)

    एमआयएमने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी रणशिंग फुंकले, उमेदवार मैदानात

    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत ३३ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या एमआयएमने (AIMIM) आता आपला राजकीय विस्तार ग्रामीण भागात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात मिळवलेल्या घवघवीत यशानंतर पक्षाने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उडी घेतली आहे. एमआयएमने जिल्हा परिषदेच्या ६ गटांत आणि पंचायत समितीच्या १५ गणांत आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजप-शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या संघर्षात आता एमआयएमच्या एन्ट्रीमुळे ग्रामीण भागातील निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळणार असून, यामुळे प्रस्थापित पक्षांच्या व्होट बँकेला सुरुंग लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

  • 25 Jan 2026 09:08 AM (IST)

    नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी दिलासा, छत्रपती संभाजीनगर मनपाकडून ५० लाखांच्या विकास निधीची तयारी

    छत्रपती संभाजीनगर शहरात पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणूक पार पडल्यानंतर, आता नवनिर्वाचित नगरसेवकांसमोर प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ही अडचण लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने राज्यातील इतर मोठ्या महानगरपालिकांच्या धर्तीवर प्रत्येक नगरसेवकाला वार्षिक ५० लाख रुपयांचा स्वेच्छा निधी उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू केला आहे. प्रभाग रचनेनुसार, एका प्रभागात चार नगरसेवक असल्यास त्या संपूर्ण प्रभागासाठी वार्षिक २ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली जाणार आहे. महापालिकेतील एकूण ११५ नगरसेवकांसाठी सुमारे ५७ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद आगामी अर्थसंकल्पात केली जाण्याची दाट शक्यता असून, यामुळे रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या स्थानिक कामांना गती मिळणार आहे.

  • 25 Jan 2026 09:01 AM (IST)

    भिवंडीत नव्या राजकीय समीकरणाची नांदी, भिवंडी सेक्युलर फ्रंट सज्ज

    भिवंडी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका आणि महापौर पदाच्या शर्यतीसाठी शहरातील राजकीय वातावरण आता कमालीचे तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि समाजवादी पक्ष यांनी एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंटची अधिकृत घोषणा केली आहे. या महाआघाडीमुळे सत्ताधारी गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळणे आणि शहराच्या विकासासाठी एक समान कार्यक्रम राबवणे हा या फ्रंटचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी महापौर पदावर आपला झेंडा फडकवण्यासाठी आतापासूनच प्रभागांनुसार मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, या नव्या युतीमुळे भिवंडीतील प्रस्थापित राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published On - Jan 25,2026 8:56 AM

Follow Us
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?.
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात.
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्.
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा.
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं.
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर...
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर....