AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Padma Awards 2026 List : केंद्राकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा सन्मान!

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने 2026 सालासाठी पद्म पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांच्या यादीत महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध व्यक्तींचाही समावेश आहे.

Padma Awards 2026 List : केंद्राकडून पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा सन्मान!
padma awards 2026Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 25, 2026 | 3:26 PM
Share

Padma Awards 2026 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. कला, साहित्य, समाजसेवा, उद्योग तसेच अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. दरम्यान, या वर्षी महाराष्ट्रातील काही मान्यवरांनाही पद्म पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे. परभणीचे श्रीरंग लाड, रघुवीर खेडकर यासारख्या इतरही काही मान्यवरांना हा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रात कोणा-कोणाला पुरस्कार मिळाले?

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातीलच अर्मिडा फर्नांडीस यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. परभणीचे श्रीरंग लाड यांनादेकील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ते एक शेतकरी आहेत. त्यांनी कापूस या पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केलेले आहे. त्यांच्याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. यासह महाराष्ट्रातीलच भिकल्या लाडक्या धिंडा यांनादेखील पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्म पुरस्कारांची विशेषता काय?

पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. हे पुरस्कार तीन प्रकारचे असतात. पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री असे हे तीन पुरस्कार आहेत. कला, समाजकार्य, प्रशासन, विज्ञान, व्यापर, उद्योग, आरोग्यसेवा, साहित्य, शिक्षण, खेळ अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान जाहीर केला जातो.

पद्म पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी (सूत्र)

भगवानदास रायकर (मध्य प्रदेश)

भिकल्या लाडक्या धिंडा (महाराष्ट्र)

ब्रिजलाल भट्ट (जम्मू आणि काश्मीर)

चरण हेमब्रम (ओडिशा)

चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)

डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू आणि काश्मीर)

कोल्लक्काइल देवकी अम्मा जी (केरळ)

महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)

नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)

ओथुवर तिरुथनी (तामिळनाडू)

रघुपत सिंग (उत्तर प्रदेश)

रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)

राजस्थानपती कलिअप्पा गौंडर (तामिळनाडू)

सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड)

श्रीरंग देवबा लाड (महाराष्ट्र)

तिरुवरूर बख्तवासलम (तामिळनाडू)

अंके गौडा (कर्नाटक)

आर्मिडा फर्नांडिस (महाराष्ट्र)

डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)

गफ्फारुद्दीन मेवाती (राजस्थान)

खेम राज सुंदरियाल (हरियाणा)

मीर हाजीभाई कासंबाई (गुजरात)

मोहन नगर (मध्य प्रदेश)

नीलेश मांडलेवाला (गुजरात)

आर अँड एस गोडबोले (छत्तीसगड)

राम रेड्डी मामिदी (तेलंगणा)

सिमांचल पात्रो (ओडिशा)

सुरेश हनगवाडी (कर्नाटक)

तेची गुबिन (अरुणाचल प्रदेश)

युनाम जात्रा सिंग (मणिपूर)

बुधरी थाठी (छत्तीसगड)

डॉ. कुमारसामी थंगराज (तेलंगणा)

डॉ. पुननियामूर्ती नटेसन (तामिळनाडू)

हेले वॉर (मेघालय)

इंद्रजित सिंग सिद्धू (चंदीगड)

के. पंजनिवेल (पुडुचेरी)

कैलास चंद्र पंत (मध्य प्रदेश)

नुरुद्दीन अहमद (आसाम)

पोकिला लेकटेपी (आसाम)

आर. कृष्णन (तामिळनाडू)

एस जी सुशीलम्मा (कर्नाटक)

तागा राम भील (राजस्थान)

विश्व बंधू (बिहार)

धर्मिकलाल चुनीलाल पंड्या (गुजरात)

शफी शौक (जम्मू आणि काश्मीर)

मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका
इम्तियाज जलील साप, निजामाचे पूर्वज; संजय शिरसाट यांची विखारी टीका.
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती
कल्याण-डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना विरोधात बसणार!वरुण सरदेसाईंची माहिती.
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका
'ते' ऐकत नाही म्हणून शिंदे सारखं दिल्लीला जातात; दानवेंची सडकून टीका.
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!
कल्याण - डोंबिवलीतील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवकांचे पोस्टर्स लागले!.
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर
नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा; शिवसेनेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर.
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा
मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं, पण...; खडसेंचा मोठा खुलासा.
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल
भाजपच्या झेंड्यातील हिरवा रंग एमआयएमचा आहे का? अंधारेंचा खोचक सवाल.
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.