AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan vs Afganistan : Air Strike चा बदला, अफगाण तालिबानने काही तासात पाकिस्तानला हादरवलं, तिथे काय घडतय?

Pakistan vs Afganistan : जगात आधीच दोन युद्ध सुरु असताना आता तिसरं युद्ध सुरु होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानात सध्या वाईट स्थिती आहे. अफगाणिस्तानच्या तालिबान राजवटीने एअर स्ट्राइकचा बदला घेण्यास सुरुवात केली आहे.

Pakistan vs Afganistan : Air Strike चा बदला, अफगाण तालिबानने काही तासात पाकिस्तानला हादरवलं, तिथे काय घडतय?
Pakistan vs Afganistan
| Updated on: Mar 13, 2026 | 12:49 PM
Share

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आता सैन्य संघर्षामध्ये बदलू लागला आहे. पाकिस्तानने रात्री उशिरा अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राइक केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून तालिबान आणि अफगाण डिफेंस फोर्सेजने मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तराची कारवाई सुरु केलीय. ताज्या रिपोर्ट्नुसार, अफगाणी सैन्याने पाकिस्तानच्या अनेक शहरांना ड्रोनद्वारे टार्गेट केलय. पाकिस्तानने गुरुवारी रात्री अफगाणिस्तानातील अनेक शहरात एअर स्ट्राइक केला होता. यात 4 जणांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले.अफगाण तालिबानच्या सीमा सुरक्षा दलाचा प्रवक्ता अबिदुल्लाह उकाब यांच्यानुसार पाकिस्तान विरुद्ध प्रत्युत्तराची कारवाई सुरु झाली आहे. पाकिस्तानच्या विभिन्न शहरात ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत.

पाकिस्तानी सैन्य केंद्रांना लक्ष्य करण्यात आल्याचा अफगाण तालिबानने दावा केला आहे. यात कोहाट सेंट्रल कमांड, कोहाट ब्रिगेड आणि कॅम्प यांचा समावेश आहे. सध्या पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरातून स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत. तिथलं प्रशासन हाय अलर्टवर आहे. अफगान तालिबान डिफेंस फोर्सेजने स्पष्ट केलय की, हे ऑपरेशन अजून थांबलेलं नाही. आमच्या भूमीवर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असं तालिबानी प्रवक्त्याने म्हटलं आहे. सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु आहे. सैन्य हालचाल वाढली आहे.

हा त्यांच्या संप्रभुतेवर हल्ला

या हल्ल्यांनी दक्षिण आशियात अस्थिरतेच एक युग सुरु केलय. पाकिस्ताननुसार त्यांनी अफगाणिस्तानात दहशतवादी तळांवर हल्ले केले आहेत. अफगाणिस्तानच्या मते हा त्यांच्या संप्रभुतेवर हल्ला असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एक्सपर्ट्सनुसार तात्काळ युद्ध विराम झाला नाही, तर या छोट्या झडपा मोठ्या क्षेत्रीय युद्धात बदलू शकतात.

पाकिस्तानने कुठे हल्ले केले?

पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूल, कंधार, पक्तिया आणि पक्तिकासह देशाच्या अन्य भागात भीषण हवाई हल्ले केले . पाकिस्तानने हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या रहिवाशी वस्त्यांना लक्ष्य केलं. अनेक नागरिकांची घर उद्धवस्त झाली आहेत, असं अफगाणिस्तानमधील तालिबानी अधिकाऱ्यांनी सांगितलं. तालिबान सरकारने पाकिस्तानच्या या सैन्य कारवाईला क्रूर आक्रमकता ठरवलं. आक्रमकतेचा कठोर शब्दात निषेध केला.

Follow Us
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार