प्रजासत्ताक दिनाला अवघा एक दिवस बाकी असताना मोठा झटका… थेट रेल्वे रुळच उडवले, प्रचंड खळबळ; हायअलर्ट जारी
प्रजासत्ताक दिनाला अवघा एक दिवस बाकी असताना मध्यरात्री एक मोठा स्फोट झाला आहे. एका नवीन रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मालगाडीला लक्ष्य करण्यात आले. थेट रेल्वेल रुळच उडवले आहे. चालक गंभीर जखमी झाला आहे.

प्राजसत्ताक दिनाच्या दिवशी देशात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असते. त्यामुळे संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात येतो. भारत-पाकिस्तान सीमांवरील बंदोबस्त आणखी वाढवला जातो. तसेच देशातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली जाते. पण, प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवसआधी पंजाबमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाल्याचे समोर आले आहे. रेल्वे ट्रॅकवर झालेल्या या ब्लास्टमुळे रेल्वे चालख गंभीर जखमी झाला आहे.
कुठे घडलं?
पंजाबच्या फतेहगढ साहिब जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनापूर्वी एक स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. हा स्फोट रेल्वे लाइनवर करण्यात आला. त्यामुळे दहशतवाद्यांचा रेल्वे लाइन उडवण्याचा कट समोर आला आहे. या स्फोटामुळे मालगाडीचे इंजिन खराब झाले आहे. मालगाडीचा चालकही या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला आहे. हा स्फोट खानपूरजवळ रेल्वे लाइनवर झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरहिंद भागात रेल्वे लाइनवर हा स्फोट रात्री सुमारे 10 वाजता झाला. ज्या वेळी स्फोट झाला, त्याच वेळी तेथून एक मालगाडी जात होती.
नेमकं काय घडलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जसजसे मालगाडीचे इंजिन खानपूर फाटकाजवळ पोहोचले, तसतसे अचानक जोरदार स्फोट व्हायरला सुरुवात झाली. स्फोटामुळे रेल्वे लाइनचा सुमारे १२ फूट भाग पूर्णपणे उद्धवस्त झाला. या स्फोटात मालगाडीचा इंजिन चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. प्रजासत्ताक दिनापूर्वी स्फोटाच्या घटनेमुळे परिसरात खबळळ माजली आहे. त्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
रोपड रेंजचे DIG नानक सिंह यांनी सांगितले की, रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी स्फोट झाला. या स्फोटात ड्रायव्हर जखमी झाला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हा खूप मोठा स्फोट नव्हता. त्यांनी सांगितले की, स्फोटामुळे मालगाडीच्या इंजिनाचे नुकसान झालेले आहे आणि रेल्वे ट्रॅकलाही नुकसान झाले आहे. पंजाब पोलिसांकडून वैज्ञानिक पद्धतीने याची चौकशी केली जात आहे. चौकशी यंत्रणांशीही संपर्क साधला जात आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल.
