प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर खास कार्यक्रमांचे आयोजन, प्रमुख पाहुणे कोण असणार?
Republic Day 2026 : 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या वर्षी वंदे मातरम गाण्याला 150 वर्षे पूर्ण झाली असल्याने, नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरी सर्व कार्यक्रम वंदे मातरम या थीमवर असणार आहेत.

दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या खास दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक राज्य म्हणून मान्यता मिळाली होती. या वर्षी वंदे मातरम गाण्याला 150 वर्षे पूर्ण झाली असल्याने, नवी दिल्लीतील कर्तव्य पथावरी सर्व कार्यक्रम वंदे मातरम या थीमवर असणार आहेत. 26 जानेवारीला कर्तव्य पथावर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या पराक्रमाचे दर्शन घडवणारी एक भव्य परेड होईल. परेडमध्ये विविध राज्यांचे सांस्कृतिक चित्र आणि आकर्षक लोकनृत्ये देखील सादर केली जाणार आहेत. भारताची ताकद आणि विविधता जगासमोर दाखविण्याची ही एक संधी आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी देशातील नागरिकच एकत्र येत नाहीत तर दरवर्षी परेडमध्ये प्रमुख पाहुण्यांना देखील आमंत्रित केले जाते.
यावर्षी प्रमुख पाहुणे कोण असणार?
या वर्षी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा परेडला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय भारताचे परराष्ट्र मंत्रालय प्रमुख पाहुण्यांच्या निवडीसाठी संभाव्य देशांची यादी तयार केली आहे. या यादीत भारताचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या देशांमधील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने तयार केलेल्या यादीला राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयाने मान्यता दिली आहे. ही प्रक्रिया निवडलेल्या देशांशी भारताचे संबंध राजकीय आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून मजबूत आहेत याची ग्वाही देते. तसेच या यादीतील नावे खरोखरच निमंत्रणासाठी पात्र आहेत की नाही याची पडताळणी केली जाते.
खास व्यवस्था
प्रमुख पाहुण्यांना कर्तव्य मार्गावर एका प्रमुख ठिकाणी बसण्यासाठी आसन व्यवस्था तयार केली जाते. सर्व प्रमुख पाहुणे भारताच्या राष्ट्रपतींसोबत बसतात आणि संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होतात. 2025 च्या प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांना भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून निवडण्यात आले होते.
6 राज्ये ‘वंदे मातरम्’ या थीमखाली चित्ररथ तयार करणार आहेत. यावेळी सरकारने एक प्रश्नमंजुषा देखील आयोजित केली आहे. या खास दिवसासाठी दिल्ली मेट्रो पहाटे 3 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या खास कार्यक्रमाला 10 हजार विशेष पाहुणे हजर असणार आहे. यात उद्योजक, शास्त्रज्ञ, शेतकरी आणि समुदाय नेते यासह विविध क्षेत्रातील लोकांची उपस्थिती असणार आहे.
30 चित्ररथ असणार
राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालयांकडून एकूण 30 चित्ररथांमध्ये स्वातंत्र्य आणि कर्तव्याच्या मार्गावर स्वावलंबनाचे विषय मांडले जातील. पाहुण्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून संरक्षण मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांनी खास नियोजन केले आहे. पार्किंग व्यवस्था आणि परिसराची माहिती ऑनलाइन शेअर केली आहे.
शालेय बँड स्पर्धेत 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 763 शाळांमधील बँड सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये 18000 विद्यार्थी सहभागी होतील. मिरवणूक निघणाऱ्या परिसरात बॅग्ज, इलेक्ट्रॉनिक उपकरणे (मोबाइल फोन वगळता), धारदार वस्तू, ज्वलनशील पदार्थ आणि इतर प्रतिबंधित वस्तू बाळगण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची तक्रार 112 वर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारत पर्व
परेड व्यतिरिक्त, भारत पर्व सांस्कृतिक महोत्सव 26 ते 31 जानेवारी दरम्यान लाल किल्ल्यावर आयोजित केला जाणार आहे. ज्यामध्ये प्रादेशिक कला, हस्तकला आणि पाककृतींचे प्रदर्शन केले जाईल. प्रजासत्ताक दिनाशी संबंधित अनेक कार्यक्रम, ज्यात शालेय बँड स्पर्धा आणि प्रोजेक्ट वीर गाथा यांचा समावेश आहे.
