AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परळ बस डेपोत दारूच्या बाटल्या, झिंगलेले कर्मचारी; अचानक भेट देताच मंत्रीही हादरले; थेट निलंबनाचे आदेश

परिवहन मंत्री प्रताप सरनाइक यांनी आज अचानक परळ येथील बस डेपोला भेट दिली. त्यानंतर त्यांना तिथे ज्या गोष्टी अढळल्या त्या पाहून धक्काच बसला आहे. त्यांनी थेट कारवाईचे आदेश दिले आहेत.

| Updated on: Jan 25, 2026 | 1:53 PM
Share
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत होणारे एसटीचे अपघात हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे आज मुंबईतील परळ बसस्थानकाला  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली. त्यांनी अचानक भेट दिल्यामुळे बस डेपोमध्ये ज्या गोष्टी सापडल्या त्या पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

1 / 5
आज मुंबईतील परळ बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांची पाहणी केली. यावेळी विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या, तसेच काही कर्मचाऱ्यांकडून मद्यपान केल्याची दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या मंत्री सरनाईक यांनी तेथे उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

2 / 5
“परगावी कर्तव्य बजावणाऱ्या चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र, अशा ठिकाणी मद्यपानासारखे निंदनीय कृत्य घडत असेल, तर ते केवळ शिस्तभंग नाही तर प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ करणारे अत्यंत धोकादायक कृत्य आहे” असे प्रताप सरनाईक म्हणाले.

3 / 5
कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने निलंबित करण्याचे सक्त निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. तसेच आज आढळून आलेल्या गैरप्रकारांबाबत स्वतंत्र विभागीय चौकशी समिती नेमून, अहवालाच्या आधारे दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.

4 / 5
या दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील स्वच्छता, प्रसाधनगृहे आणि बसेसच्या नियोजनाचीही पाहणी केली. प्रवाशांच्या सुरक्षितता व सुखसुविधांबाबत अधिक दक्ष राहण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

5 / 5
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.