Video: गरिबांचा अक्षय खन्ना; गौरव मोरेने केला धुरंधरमधील गाण्यावर डान्स, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

Video: सध्या सोशल मीडियावर धुरंधर चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. खास करुन अक्षय खन्नाच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता सोशल मीडियावर मराठमोळा अभिनेता गौरव मोरेने अक्षय खन्नाची स्टाईल कॉपी केली आहे. एकदा व्हिडीओ नक्की पाहा...

Video: गरिबांचा अक्षय खन्ना; गौरव मोरेने केला धुरंधरमधील गाण्यावर डान्स, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
Gaurav more Dance
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 11, 2025 | 1:42 PM

सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. तो म्हणजे धुरंधर. या चित्रपटाने फक्त पाच दिवसांमध्ये जवळपास 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, या चित्रपटातील अभिनेता अक्षय खन्नाच्या भूमिकेने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे. त्याच्या डान्सने तर सर्वांची मने जिंकली आहेत. आता सोशल मीडियावर मराठमोळा अभिनेता गौरव मोरेने अक्षय खन्नाच्या गाण्यावर डान्स करत व्हिडीओ शेअर केला आहे. हा डान्स पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

काय आहे व्हिडीओ?

अभिनेता गौरव मोरेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रिल शेअर केले आहे. या रिलमध्ये तो FA9LA या गाण्यावर हुबेहुब अक्षय खन्नाच्या एण्ट्री पासून ते डान्स पर्यंत सर्व काही कॉपी करताना दिसत आहे. गौरव मोरेचा हा डान्स सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. दरम्यान, गौरवने पिस्ता रंगाचा कुर्ता घातला आहे. तसेच त्याने हा व्हिडीओ कोणत्यातरी कार्यक्रमात शूट केल्याचे दिसत आहे.

Video: सुजलेले डोळे, तोंडाला मास्क; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधना पहिल्यांदाच आली सर्वांसमोर

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सध्या सोशल मीडियावर गौरव मोरेचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने मजेशीर अंदाजात ‘गरीबांचा अक्षय खन्ना’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने १ नंबर भावा असे म्हटले आहे. खूप सुंदर गौरव दा, रावस ना भाऊ, अय बच्ची डान्स अशा वेगवेगळ्या कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत. अनेकांनी गौरवचा हा व्हिडीओ लाईक केला आहे.

डान्स स्टेप्स विषयी

‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाने जो डान्स केला आहे, तो कोणी कोरिओग्राफ केलेला नाही. तो स्वतः अभिनेत्याने शूटिंगच्या वेळी सहज केला आणि आता सगळ्यांचा फेव्हरेट बनला आहे. पण त्या डान्स स्टेप्स त्याने त्याचे वडील विनोद खन्ना यांच्या कॉपी केल्या आहेत. ३६ वर्षांपूर्वी पाकिस्तानातील लाहोरमध्ये विनोद खन्नांनी तोच डान्स केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत काही पाकिस्तानी क्रिकेटपटूही सामील होते. आता हूबेहूब तशाच स्टेप त्यांचा मुलगा अक्षय खन्नानेही करून दाखवल्या आहेत.