AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil: ती स्टेजवर आली अन्… गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पोलिसांची एण्ट्री, पुढे काय घडलं?

Gautami Patil: गौतमी पाटीलचा अहिल्यानगरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. त्यानंतर पोलिसांची एण्ट्री होताच... नेमकं काय घडलं? वाचा

Gautami Patil: ती स्टेजवर आली अन्... गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पोलिसांची एण्ट्री, पुढे काय घडलं?
Gautami PatilImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 8:36 AM
Share

नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की तुफान गर्दी आलीच. नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात खंडोबानगर येथील खंडोबा मैदानावर देखील गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. गौतमी पाटीलची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. दरम्यान, अचानक या कार्यक्रमात पोलिसांची एण्ट्री झाली. त्यांनी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी हलका लाठीचार्ज करण्यात आला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात खंडोबानगर येथील खंडोबा मैदानावर आयोजित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली. मात्र या गर्दीत काही जणांकडून हुल्लडबाजी झाल्याने कार्यक्रमस्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांना हस्तक्षेप करून गर्दीवर नियंत्रण ठेवावे लागले. गणेशभक्त आणि सांस्कृतिक रसिकांसाठी आयोजित या महोत्सवात गौतमी पाटील यांचा विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच मोठ्या संख्येने प्रेक्षक दाखल झाले. स्थानिक नागरिकांसह परिसरातील गावांमधूनही अनेक जण मैदानावर पोहोचले होते. गौतमी पाटील यांची लोकप्रियता लक्षात घेता गर्दी अपेक्षेपेक्षा जास्त झाली.

प्रेक्षकांमध्ये धक्काबुक्की सुरू

कार्यक्रम सुरू झाल्यानंतर गर्दी वाढत गेली. मैदानाच्या आसपास जागा अपुरी पडू लागली. काही वेळातच प्रेक्षकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. काही जणांकडून हुल्लडबाजी केली जाऊ लागली. यामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळ निर्माण झाला. महिला आणि लहान मुलांनाही अडचणीचा सामना करावा लागला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला.

पोलिसांची एण्ट्री

पोलिसांनी किरकोळ लाठीमार करत गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. कार्यक्रमाचे आयोजक आणि स्वयंसेवकांनीही गर्दी व्यवस्थापनात सहकार्य केले. पोलिसांच्या उपस्थितीमुळे पुढील गोंधळ टाळता आला आणि कार्यक्रम पुन्हा सुरळीत सुरू झाला.

गौतमी पाटील आपल्या आकर्षक नृत्यशैलीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. गणेशभक्ती आणि सांस्कृतिक वारसा जपणारा हा कार्यक्रम शेवगावकरांसाठी खास आकर्षण ठरला. स्थानिक पोलिस प्रशासनाने सांगितले की, अशा मोठ्या कार्यक्रमांमध्ये गर्दी नियंत्रणासाठी आधीच नियोजन करणे आवश्यक आहे. या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसल्याने दिलासा मिळाला आहे.

Follow Us
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू