AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautami Patil : गच्चीवर झाली पहिली भेट, आमची जोडी परफेक्ट ! गौतमी पाटीलचं जुळलं ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल  उखाणा..

Gautami Patil : गौतमी पाटील ही सातत्याने चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती बरीच ॲक्टिव्ह असते. नुकता तिने लग्नाचा व्हिडीओ शेअर केला असून त्यात तिने नवऱ्यासाठी आखस उखाणा घेतला. गौतमीचं कोणाशी जुळलंय ?

Gautami Patil : गच्चीवर झाली पहिली भेट, आमची जोडी परफेक्ट ! गौतमी पाटीलचं जुळलं ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल  उखाणा..
गौतमी पाटीलचं लग्न ?Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 18, 2026 | 9:17 AM
Share

महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना असलेली गौतमी पाटील (Gautami Patil) सदैव चर्चेत असते. तिचं सौदर्य, अदा आणि तिचं नृत्य याचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावरही तिचे लाखो फॉलोर्स असते. आपल्या नृत्याने सर्वांना वेड लावणारी गौतमी हिच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. सोशल मीडियावरही गौतमी खूप ॲक्टिव्ह असते. अनेक पोस्ट करत चाहत्यांसोबत ती अपडेट्स शेअर करत असते, तिच्या नृत्याचे, नव्या कामाचे अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास बरेच लोक उत्सुक असतात. मात्र गौतमी नुकताच एक असा व्हिडीओ शेअर केल्या ज्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हा व्हिडीओ आहो गौतमीच्या लग्नाचा, आणि त्यात ती चक्क तिच्या पतीसाठी थेट उखाणा घेताना दिसली आहे. हा व्हिडीओ पाहून लोकं चांगलेच चक्रावले असून गौतमीचं लग्न कधी झालं, कोणाशी झालं, कोणाशी तिची गाठ जुळली असे असंख्य प्रश्न लोकांच्या मनात आहेत.

गौतमी पाटीलचं कोणाशी लग्न ?

अवघ्या काही तासांपूर्वीच गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून हजारो लाईक्स आले असून त्यावर कमेंट्समधून प्रश्नांचा भडिमारही करण्यात आला आहे. हिरव्या रंगाची, छान बुट्टे असलेली साडी, दागिने, केसांत गजरा, डोक्यावर मुंडावळ्या आणि हसतमुख चेहरा अशा स्वरुपात असलेली गौतमी आणि तिच्या शेजारी मुंडावळ्या बांधून उभा असलेला तरूण पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. एखाद्या लग्नाचा व्हिडीओ असलेल्या या पोस्टमध्ये गौतमीने पतीसाठी खास उखाणाही घेतलाय. आणि विशेष म्हणजे याचं एक गच्ची कनेक्शनही आहे. आता गौतमीने कोणाशी लग्न केलं असा प्रश्न तुम्हालाही पडला ना?, चला जाणून घेऊया,

गौतमी पाटीलचा स्पेशल उखाणा

वधूवेषात, कपाळाला मुंडावळ्या लाऊन उभ्या असलेल्या गौतमीने नवरदेवासाठी खास उखाणाही घेतलाय. ‘ ना वाय-फाय, ना इंटरनेट, गच्चीवर झाली आमची पहिली भेट…ओंकार रावांचं नाव घेते, आमची जोडी एकदम परफेक्ट !’ हसतमुखाने असा उखाणा घेत लाजलेल्या गौतमीने शेजारीच उभ्य असलेल्या ओंकारच्या खांद्यावर लाडाने डोकंच ठेवलं. तिचा उखाणा ऐकून उपस्थितांनी वा वा म्हणत, टाळ्यांचा कडकडाट केला..

आता हे सगळं वाचूनही तुम्हाला गौतमीच्या लग्नाबद्दल प्रश्न पडलाय का ? चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर खुद्द गौतमीनेच दिलं आहे. हा व्हिडिओ तिच्या म्युझिक व्हिडिओच्या शूटिंगचा एक भाग असल्याचं तिनेच सांगितलं आहे. मध्यंतरी गाजलेलं ‘गच्चीवरून कशी दिसते’ हे लोकप्रिय गाणं, आता पुन्हा रिमेक स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच गाण्यात ओंकार राऊत आणि गौतमी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या निमित्ताने गौतमी आणि ‘हास्य जत्रा फेम’ ओंकार राऊत यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

गौतमीच्या या व्हिडीओवर कमेंट्स प्रचंड पाऊस पडला आहे. ओंकार राऊत ❤️ मस्त आहे , होऊनच जाऊद्या मग आता…🔥 अशी कमेंट एकाने केली . तर अनेकांनी दोघाना आगामी प्रोजेक्टसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच