‘डोक्यावर पदर घ्यायचा असतो…’ अभिनेत्री जिनिलीया वट सावित्रीच्या पूजेमुळे का झाली ट्रोल?
सर्व महिलांप्रमाणे देशमुखांची सून असलेली जिनिलीयाने पती रितेशसाठी वटसावित्रीची पूजा केली. तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केला आहे. पण या व्हिडीओवरून कोणी तिचं कौतुक केलं आहे अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

10 जून रोजी वटसावित्रीची पूजा सर्वच स्त्रियांनी केली. त्यात काही सेलिब्रिटींनी देखील जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वटसावित्रीचा उपवास ठेवला होता. त्यात एक अभिनेत्री म्हणजे रितेश देशमुखची पत्नी तथा अभिनेत्री जिनिलीया डिसूझा. अभिनेत्री जिनिलीया डिसूझाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये जिनिलीया तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट सावित्रीची पूजा करताना दिसत आहे.
विवाहित हिंदू महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे वटसावित्रीचे व्रत करतात. जेनेलियानेही ही पूजा पूर्ण भक्तीने केली, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. जिनिलीयाने इंस्टाग्रामवर वटसावित्रीची पूजा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
‘प्रिय नवरा, मी तुझ्यावर खूप….’
या व्हिडिओमध्ये जिनिलीया सलवार सूटमध्ये दिसत आहे आणि वट सावित्रीची पूजा करताना आणि वटवृक्षाभोवती दोरा गुंडाळताना दिसत आहे. जिनिलीयाचा हा व्हिडिओ रितेश देशमुखने देखील इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे, तिने पोस्ट शेअर करून जिनिलीयाने लिहिले आहे,” प्रिय नवरा, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, बस्स” त्यावर रितेशने देखील रिप्लाय करत रितेश देशमुखने तिच्यासाठी पोस्ट केली आहे.
‘माझी प्रिय पत्नी जेनेलिया…’
रितेशने तोच व्हिडिओ शेअर करताना जेनेलियाला टॅग केले आहे आणि लिहिले आहे की, ‘माझी प्रिय पत्नी जेनेलिया, तू माझ्या आयुष्यात आहेस याचा मला खरोखरच आनंद आहे. तू माझा आधार आहेस, तू माझी शक्ती आहेस, तू माझे धैर्य आहेस, माझे जीवन आहेस. मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो.’
View this post on Instagram
काहींनी तिला ट्रोल केलं तर काहींनी कौतुक
यावर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केली आहे. एकाने म्हटलं आहे ,’बायको अशी असावी, नाही का रितेश बाबू?’ तर काहींनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. एका युजरने म्हटलं आहे, “आम्ही डोक्यावर दुपट्टा किंवा साडीचा पदर घेऊन पूजा करतो.”
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, जिनिलीया लवकरच आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘सितारे जमीन पर’मध्ये जेनेलिया देशमुखने 60 वर्षीय आमिर खानच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.