
बॉलिवूडचा दबंग स्टार याने अेक अभिनेत्रींना त्याच्या चित्रपटातून लाँच केलं. त्यापैकीच एक म्हणजे झरीन खान. सलमानसोबत ‘वीर’ चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, पण हिंदी चित्रपटसृष्टीत तिची डाळ फारशी शिजली नाही हेच खरं. तिचं प्रोफेशनल लाइफ काही खास नाही, फारसं काम तर मिळाल नाहीच पण गेल्या वर्षी तिला ब्रेकअपच्या वेदनाही सहन कराव्या लागल्या. याच सगळ्यादरम्यान, 38 वर्षीय झरीन खानने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या लग्नाबद्दल बोलली आहे.
लग्नाबद्दल काय म्हणाली झरीन खान ?
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये झरीन खान म्हणाली की, मी इंस्टाग्रामवर, माझ्या व्हिडिओंवर, माझ्या पोस्टवर काही कमेंट वाचल्या आणि त्यात एक कमेंट आहे ज्याने खूप लक्ष वेधले. तुम्हाला माहिती आहे का ती कमेंट कोणती? लग्न करं, तू तर म्हातारी हत चालली आहेस.आणि त्यावर अभिनेत्रीने मजेशीर पण तितंकच चोख उत्तर दिलं, लग्न केल्यावर मी काय तरूण होणार आहे का ? असा सवालच तिने त्या यूजरला विचारला.
लग्न हे प्रत्येक समस्येचं सोल्यूशन आहे का ?
पुढे जरीन खान म्हणाली, ‘मला समजत नाही की हे फक्त आपल्या देशातच आहे की ही एक सार्वत्रिक समस्या आहे. कुठेतरी लग्न हाच प्रत्येक समस्येवरचा उपाय मानला जातो. जर एखादी व्यक्ती जीवनात लक्ष केंद्रित करत नसेल, कोणतेही काम करत नसेल, तर कुटुंबातील सदस्यांचा त्याच्यासाठी उपाय म्हणजे त्याचे लग्न लावून देणं हा असतो.
पण हा उपाय कसा असू शकतो? जो माणूस स्वतःची जबाबदारी घेऊ शकत नाही आणि निःशस्त्रांची काळजी घेऊ शकत नाही, त्याच्यावर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची जबाबदारी लादता. म्हणजे, त्यामुळे तो स्वतःचे तर आयुष्य खराब करेलच पण दुसऱ्याचे आयुष्यही उध्वस्त करेल. हे असं बरोबर आहे असं मला वाटत नाही” असंही झरीनने नमूद केलं.
आजकाल लग्नं टिकत नाहीत
जरीन पुढे म्हणाली, “ मग जर मूल, तो मुलगा असो वा मुलगी, हाताबाहेर गेले, (जी आपल्या समाजातील विचारशील पालकांसाठी सर्वात मोठी भीती असते) तर त्यावर उपाय म्हणजे मुलाचे लग्न करणं.
लग्न म्हणजे काही जादू आहे का की ते केलं की सगळं काही ठीक होतं. मी पाहत्ये की आजकाल बरीचशी लग्न तर 2-3 महिन्यांतच मोडतात. लग्न हे काही सगळ्या समस्यांवरचं उत्तर आहे असं मला तरी वाटतं नाही” असं झरीनने पुढे नमूद केलं.
38 व्या वर्षी सिंगल आहे अभिनेत्री
अभिनेत्री झरीन खान सध्या 38 वर्षांची असून ती सिंगल आहे. बिग बॉस स्पर्धक शिवाशिष मिश्रासोबत ती तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होती, परंतु 2024 साली त्यांचे ब्रेकअप झाले. तेव्हापासून ती सिंगल लाईफ एन्जॉय करत्ये.