छोट्या पुढारीकडून सूरज चव्हाण याच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा, अखेर घनश्यामने…

छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. घनश्याम दरोडे बिग बॉसच्या घरात धमाल करताना दिसला. सूरज चव्हाणच्या लग्नाला घनश्याम गैरहजर असलेल्याने विविध चर्चा या रंगताना दिसल्या.

छोट्या पुढारीकडून सूरज चव्हाण याच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा, अखेर घनश्यामने...
Chhota Pudhari
| Updated on: Dec 05, 2025 | 11:59 AM

बिग बॉस 5 चा विजेता सूरज चव्हाण याने बालपणापासूनची मैत्रिण संजना हिच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे सूरज चव्हाण याच्या लग्नात असंख्य लोकांनी गर्दी केली होती. सूरजच्या लग्नाची मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. अंकिता हिने सूरजच्या लग्नात शॉपिंग करण्यास त्याची मदत केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला घर दिले. बिग बॉसच्या फक्त सूरज विजेताच नाही तर बिग बॉसच्या घरात गेल्यापासून सूरजचे आयुष्य बदलून गेले. दोन जोडी कपडे घेऊन बिग बॉसच्या घरात दाखल होणारा सूरज आज मोठ्या संपत्तीचा मालक बनला आहे. बिग बॉसच्या घरातील अनेक कलाकार सूरजच्या लग्नात सहभागी झाले. बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये सूरज चव्हाण आणि छोटा पुढारी अर्थात घनश्याम दरोडे यांच्यात चांगली मैत्री बघायला मिळाली.

दोघेही अनेकदा एकमेकांना समजून सांगताना दिसले. मात्र, घनश्याम हा सूरज चव्हाणच्या लग्नाला पोहोचला नसल्याने अनेकांनी त्याला काही प्रश्न विचारले. फक्त प्रश्नच नाही तर दोघांमध्ये वाद झाल्याचीही चर्चा रंगताना दिसली. अखेर घनश्याम दरोडे याने सूरज चव्हाणच्या लग्नाला न पोहोचण्याचे थेट कारणच सांगून टाकले आहे. आपण सूरजच्या लग्नाला का गेलो नाही यावर छोट्या पुढारीने एक व्हिडीओ तयार केला आहे.

29 नोव्हेंबर 2025 रोजी सूरजचे लग्न झाले. आता व्हिडीओ शेअर करत छोट्या पुढारीने म्हटले की, मुळात म्हणजे मला या विषयावर व्हिडीओ बनवायचा नव्हता. पण बऱ्याच जणांचे कमेंट येत आहेत. बरेच जण बोलत आहेत. घनश्यामजी तुम्ही बऱ्याच प्रश्नावर उत्तरे देतात. कोणी आरोप केले तरीही ते आरोप सहजपणे फेटाळून लावतात. मग सूरज चव्हाणच्या लग्नाला का केले नाही, याचे उत्तर आम्हाला द्या. बऱ्याच जणांनी कमेंट केल्या.

छोटा पुढारी पुढे बोलताना म्हणाला की, मित्रांनो… मलाही त्याच्या लग्नाला जायचे होते. पण खरंच सांगतो… माझे जे दाैरे चालू होते.. माझे tv9 मराठीसोबत करार झाला आहे. शो सोडून मला कुठेही जाता येत नाही. काही शो असतील तर मला ते करतात येतात नाही तर मला ते शो करता येत नाहीत. तीन महिन्यांचे tv9 मराठीसोबत माझे टायप असल्याने मला कुठे जाता येत नाही. जर महत्वाचे घरातील काही असेल तर मला सुट्टी काढता येते.

सूरज चव्हाणचे ज्यादिवशी लग्न झाले म्हणजे 29 तारखेला.. तेंव्हा मी अमरावतीत होतो. मित्रांनो तिथून मला येणं शक्य नव्हतं. तेंव्हा तुम्ही स्टोरीही बघितली असेल किंवा नसेल बघितली. तेंव्हा त्या तारखेची मी स्टोरीही टाकलेली आहे. तुम्हाला वाटेल की, हे खोटे बोलतात किंवा बनवतात आपल्याला पण तसे नाहीये. त्यामुळे कोणी ट्रोल नका करू की, सूरज चव्हाणच्या गरीबाच्या लग्नाला तू गेला नाही. सूरज चव्हाण एक निरागस व्यक्तीमहत्व आहे. त्या भावाच्या मागे आमच्या कायम शुभेच्छा असतील. या  निवडणुका झाल्या की, मी 100 टक्के त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेईल.