छोटा पुढारी
घनश्याम दरोडे हे छोटा पुढारी म्हणून अत्यंत लोकप्रिय आहे. हजरजबाबीपणा, गावरान बोलीचा ठसका, कमालीचा राजकीय समंजसपणा आणि फिरकी घेण्याची हातोटी यामुळे छोटा पुढारी लोकप्रिय ठरले आहेत. त्यांची लोकप्रियता सिनेसृष्टीपर्यंत गेली. त्यामुळेच बिग बॉस मराठी 5 सीजनमध्ये ते सहभागी झाले होते. त्यांची उंची 3 फूट 7 (112 सेमी) इंच असली तरी त्यांचा वकूब आणि वावर अफाट आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले घनश्याम अवघ्या 24 वर्षाचे आहेत. सध्या टीव्ही9 मराठीसाठी गावागावात जाऊन निवडणुकीत राजकीय आढावा घेण्याचं काम ते करत आहेत.
हिंगोलीत कोणचं वर्चस्व? काय सांगतो मतदार राजा?
हिंगोली शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांचे प्रमुख प्रश्न समोर आले आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या असून, नागरिकांना पाच ते सहा दिवसांतून एकदा पाणी मिळते. तसेच, शहरातील रस्ते खराब असल्याने अपघात वाढले आहेत. निवडणुकीपुरती आश्वासने देणाऱ्या नेत्यांबाबत मतदारांमध्ये नाराजी आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Dec 4, 2025
- 3:58 pm
विकासाच्या मुद्द्यांवर कधी होणार चर्चा? सोलापूरकरांचा कौल काय?
सोलापूर नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत छोटा पुढारीने नागरिकांचे म्हणणे जाणून घेतले. रस्ते, पाणी, गटार, शैक्षणिक कामांसाठी सर्वर डाउन यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. नेत्यांच्या भ्रष्टाचारावर आणि पक्षबदलाच्या राजकारणावर जनतेचा विश्वास उडाला आहे, तरीही लोकशाही टिकवण्यासाठी मतदानाचे आवाहन केले जात आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Dec 2, 2025
- 3:32 pm
कोल्हापूर निवडणुकीचा रणसंग्राम! कलानगरीत कुणाची हवा?
कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील नागरिकांनी आगामी निवडणुकीपूर्वी अनेक प्रश्न मांडले आहेत. रस्ते, पाणी, पार्किंग आणि स्वच्छतेचा अभाव, निधीचा गैरवापर तसेच वाढती महागाई व बेरोजगारी हे प्रमुख मुद्दे आहेत. राजकारण्यांवरील नाराजी आणि प्रभावी विकासकामांच्या अपेक्षा यावर जनतेने आपले मत व्यक्त केले.
- राखी राजपूत
- Updated on: Dec 2, 2025
- 3:15 pm
विकासाच्या प्रतीक्षेत पंढरपूरकर! छोटा पुढारीच्या माध्यमातून जनतेचा आवाज
पंढरपूरच्या आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी छोटा पुढारीने जनतेचा कौल जाणून घेतला. खराब रस्ते, गटार, कचरा, पार्किंग, बेरोजगारी आणि शिक्षणातील गोंधळासारख्या मूलभूत समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. भाविकांसाठी सुविधांचा अभाव आणि निधी असूनही विकासाची वानवा, हाच पंढरपूरकरांचा मुख्य अजेंडा आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Dec 2, 2025
- 2:29 pm
निवडणुकीत बीडकरांचा अजेंडा काय? विचारतोय छोटा पुढारी
टीव्ही ९ मराठीचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे परळी, बीडमधून स्थानिक निवडणुकांमधील जनतेचे विचार जाणून घेतो. महागाई, रस्त्यांची दुरवस्था, रोजगार आणि विकासाचे प्रश्न नागरिक उपस्थित करतात. धनंजय मुंडे यांच्या गटांतरामुळे बदललेल्या राजकीय समीकरणांवर आणि ग्रामीण भागातील शेतीच्या समस्यांवरही जनता आपले मत व्यक्त करते, विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरकारभारावर नाराजी दर्शवते.
- राखी राजपूत
- Updated on: Dec 2, 2025
- 2:17 pm
निवडणुकीत कोण कुणावर भारी? विचारतोय छोटा पुढारी
अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य निवडणुकांदरम्यान छोटा पुढारीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीवर प्रकाश टाकला आहे. अहिल्यानगर मार्केटमध्ये कांद्याला प्रति किलो अवघे २ ते ८ रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने अन्नदात्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Dec 2, 2025
- 1:25 pm
निवडणुकीत कोण कुणावर भारी? विचारतोय छोटा पुढारी
छत्रपती संभाजीनगरमध्ये चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य निवडणुका प्रलंबित आहेत. टीव्ही ९ मराठीच्या ‘छोटा पुढारी’ घनश्याम दरोडे यांनी शहरातील राजकीय वातावरण आणि जनतेच्या भावना जाणून घेतल्या. शिवसेना फुटीनंतर बदललेल्या समीकरणांवर नागरिकांनी भाष्य केले, विकासकामे, पाणीप्रश्न आणि नेतृत्वाच्या मुद्द्यांवर विविध मते व्यक्त केली.
- राखी राजपूत
- Updated on: Dec 2, 2025
- 1:26 pm
नगरपरिषदेवर कुणाची सत्ता? काय म्हणते तुळजापूरची जनता?
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जनतेने आपले मत व्यक्त केले आहे. नुकसान भरपाई न मिळणे, महागाई, अस्वच्छता आणि तुळजाभवानी मंदिरातील भाविकांना भेडसावणाऱ्या सोयीसुविधांचा अभाव हे प्रमुख मुद्दे आहेत. पैसे घेऊन दर्शन मिळणे, रांगांचे गैरव्यवस्थापन यावरही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Dec 2, 2025
- 1:27 pm
नागरिकांची जुन्या चेहऱ्यालाच साथ, ओमराजे जागा राखणार?
धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नागरिकांमध्ये जुन्या चेहऱ्यांबाबत संमिश्र भावना आहेत. विकासकामांचा अभाव, प्रलंबित १४० कोटी रुपयांचा निधी, खराब रस्ते आणि अस्वच्छ बाजारपेठा यांसारख्या समस्यांवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारवर टीका केली.
- राखी राजपूत
- Updated on: Dec 2, 2025
- 1:28 pm