AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना यांची ती पोस्ट शेअर करताच हजारोंनी फॉलोअर्स घटले; गिरीजा ओकचा खुलासा

अभिनेत्री गिरीजा ओकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. कंगना राणौत यांच्यासोबत ती आगामी 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गिरीजा नेमकं काय म्हणाली, ते सविस्तर वाचा..

कंगना यांची ती पोस्ट शेअर करताच हजारोंनी फॉलोअर्स घटले; गिरीजा ओकचा खुलासा
Kangana Ranaut and Girija OakImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 05, 2026 | 10:07 AM
Share

‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक लवकरच ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत गिरीजाने तिच्यासोबत घडलेली एक अजब गोष्ट सांगितली. कंगना यांची एक पोस्ट शेअर करताच माझे इन्स्टाग्राम फॉलोअर्स कमी झाले, असा खुलासा तिने या मुलाखतीत केला. त्याचसोबत ‘आपण प्रत्येकालाच आनंदी ठेवू शकत नाही’, असं स्पष्ट मत तिने मांडलं आहे.

‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत गिरीजा म्हणाली, “भारत भाग्य विधाता हा माझा चित्रपट येत्या 12 जूनला प्रदर्शित होणार आहे. आपल्या आयुष्यातील सर्वसामान्य व्यक्ती, रोजची कामं करणारे आपले सहकारी, सफाई कर्मचारी, पोलीस, नर्स अशा लोकांचं सेलिब्रेशन करणारा हा चित्रपट आहे. ही गोष्ट कामा रुग्णालयातील नर्सेसची आहे. 26/11 च्या हल्ल्यादरम्यान या रुग्णालयात काय परिस्थिती होती, याचं चित्रण त्यात करण्यात आलं आहे. या चित्रपटाचे विविध पोस्टर आणि कंटेंट मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करतेय. या चित्रपटाची निर्मिती कंगना राणौत यांनी केली आहे. त्यांनी यात उत्तम भूमिकासुद्धा साकारली आहे. मी नुकतीच त्यांची एक पोस्ट माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली होती. पण त्यानंतर माझे फॉलोअर्स हजारांनी कमी झाले. कारण मी त्यांचा फोटो पोस्ट केला होता.”

पहा ट्रेलर-

याविषयी आपलं स्पष्ट मत मांडत गिरीजा पुढे म्हणाली, “काही वेळानंतर जेव्हा मी दुसरी एक पोस्ट शेअर केली, तेव्हा पुन्हा फॉलोअर्स वाढले. तर सांगण्याची गोष्ट अशी आहे की, आपण सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. मी प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही. किती लोकांनी आपली पोस्ट पाहिली, फॉलोअर्सची संख्या वाढली की घडली याला खरंतर काहीही महत्त्व नाही. शेवटी तुम्हाला जो निर्णय योग्य वाटतो, तो घेऊन काम करत राहायचं असतं.”

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत कंगना राणौत यांनी गिरीजाच्या ‘नॅशनल क्रश’च्या टॅगवर प्रतिक्रिया दिली होती. ‘कृपया तुझ्या सौंदर्याचा वापर करून आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी कर’, असं त्यांनी गमतीने गिरीजाला म्हटलं होतं.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता