Jawan सिनेमातील ‘गर्ल गँग’ने वेधलं सर्वांचं लक्ष; ‘या’ 5 मुलींच्या जोरावर शाहरुख खानने उडवली खळबळ

Jawan Girl Gang : शाहरुख खान याच्या 'जवान' सिनेमाचा सर्वत्र बोलबाला; 'या' 5 मुलींमुळे किंग खान याच्या आगामी सिनेमाला मिळणार यश!

Jawan सिनेमातील गर्ल गँगने वेधलं सर्वांचं लक्ष; या 5 मुलींच्या जोरावर शाहरुख खानने उडवली खळबळ
| Updated on: Sep 07, 2023 | 12:32 PM

मुंबई : 7 सप्टेंबर 2023 | ‘पठाण’ सिनेमानंतर अभिनेता शाहरुख खान याच्या ‘जवान’ सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून किंग खान ‘जवान’ सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय आहे. गुरुवारी दहीहंडीच्या मुहूर्तावर अभिनेत्याने ‘जवान’ सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात किंग खान याच्यासोबत अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन देखील चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. पण सिनेमात आणखी पाच अभिनेत्री दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘या’ पाच अभिनेत्री सिनेमात दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. तर जाणून घेवू ‘त्या’ पाच अभिनेत्रींबद्दल…

गिरिजा ओक गोडबोले- मराठी सिनेविश्वात गिरिजा हे नाव फार मोठं आहे. ‘जवान’ सिनेमात अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. गिरिजा एक थिएटर आर्टिस्ट आहे. ‘जवान’ आधी अभिनेत्रीने ‘तारे जमीन पर’ सिनेमात देखील दिसली आहे. शिवाय अभिनेत्रीने ‘कला’, ‘शोर इन द सिटी’ यांसारख्या सीरिजमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

सान्या मल्होत्रा – आमिर खान याच्या ‘दंगल’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा किंग खान याच्या ‘जवान’ सिनेमात देखील दिसणार आहे. सान्या देखील किंग खान यांच्या ‘जवान’ सिनेमातील ‘गर्ल गँग’मधील एक आहे.

लहर खान- अभिनेत्रीने ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात देखील भूमिका बजावली आहे. याशिवाय अभिनेत्री ‘पार्च्ड’ सिनेमात देखील भूमिका साकारली होती. आता लहर ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

संजीता भट्टाचार्य- अभिनेत्री किंग खान याच्या ‘जवान’ सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आली आहे. अचानक अभिनेत्रीला सिनेमाची ऑफर मिळाली. संजीता देखील किंग खान यांच्या ‘जवान’ सिनेमातील ‘गर्ल गँग’मधील एक आहे.

प्रियमणी – प्रियामणी पुन्हा एकदा शाहरुखच्या जवानमध्ये दिसणार आहे. याआधी प्रियामणीने ‘चेन्नई एक्सप्रेस’मधील ‘वन टू थ्री फोर’ या गाण्यात किंग खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. ‘जवान’ सिनेमात देखील अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सध्या सर्वत्र ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहेत. ‘पठाण’ सिनेमानंतर बॉक्स ऑफिसवर अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर 2’ सिमेमाने राज्य केलं. आता किंग खान  याचा ‘जवान’ सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.