धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हिरोच्या भूमिकेत, 'धुमस'चा ट्रेलर रिलीज

पुणे : दक्षिण भारतात अभिनेता ते नेता असा अनेकांचा प्रवास पाहायला मिळतो. मात्र, महाराष्ट्रात आता नेता ते अभिनेता असा काहीसा लक्ष वेधून घेणारा प्रवास पाहायला मिळणार आहे. कारण धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे राजकीय व्यासपीठावरुन थेट चंदेरी पडद्यावर एन्ट्री घेत आहेत. त्यांच्या आगामी ‘धुमस’ सिनेमाचा ट्रेलरही रिजील झाला आहे. रोमान्स आणि अॅक्शनचे मिश्रण असलेल्या …

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हिरोच्या भूमिकेत, 'धुमस'चा ट्रेलर रिलीज

पुणे : दक्षिण भारतात अभिनेता ते नेता असा अनेकांचा प्रवास पाहायला मिळतो. मात्र, महाराष्ट्रात आता नेता ते अभिनेता असा काहीसा लक्ष वेधून घेणारा प्रवास पाहायला मिळणार आहे. कारण धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे राजकीय व्यासपीठावरुन थेट चंदेरी पडद्यावर एन्ट्री घेत आहेत. त्यांच्या आगामी ‘धुमस’ सिनेमाचा ट्रेलरही रिजील झाला आहे.

रोमान्स आणि अॅक्शनचे मिश्रण असलेल्या ‘धुमस’च्या ट्रेलरमुळे चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रिअल लाईफ मध्ये नेते असलेले उत्तमराव जानकर आणि गोपीचंद पडळकर या चित्रपटात अभिनेत्याच्या रूपाने सुद्धा सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना दिसणार आहेत. तसेच गोपीचंद पडळकर, साक्षी चौधरी आणि रोहन पाटील, कृतिका गायकवाड या दोन जोड्यांची रोमँटीक केमिस्ट्री प्रेक्षकांच्या मनाला भिडते. याशिवाय विशाल निकम, भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते, अनिल नगरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका ‘धुमस’मध्ये आहेत.

कोण आहेत गोपीचंद पडळकर?

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या प्रत्येक आंदोलनाचे नेतृत्व गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. गोपीचंद पडळकर भाजपमधील धनगर समाजाचे नेते म्हणून महत्त्वाच्या पदावर होते. मात्र काही गोष्टींवरुन बिनसल्याने पडळकरांनी पक्षाला राम राम करत राजीनामा दिला आहे. सांगली लोकसभेसाठी गोपीचंद पडळकर इच्छुक उमेदवार आहेत. आता त्यांना स्वाभिमानीकडून उमेदवारी मिळणार की भाजपकडून, हे अद्याप निश्चित नाही. मात्र, सांगलीतून ते प्रबळ दावेदार मानले जातात.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशात सध्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. नुकतेच भाजपने ‘मै भी चौकीदार’ हे गाणं प्रदर्शित केलं आहे. चौकीदार या शब्दावर यावेळी भाजपने लक्ष केंद्रित केलं असून प्रचाराला सुरुवात केली आहे. सध्या प्रत्येक उमेदवार आपल्या प्रचारासाठी नवी-नवीन कल्पना लढवत आपला प्रचार करत आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी थेट निवडणूकीच्या पार्श्नभूमीवर चित्रपट तयार केला आहे. ‘धुमस’ असं या चित्रपटाच नाव आहे. नुकताच मुंबईत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

धनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर यांची ओळख आहे. सांगलीमध्ये मोठ्या संख्येने पडळकरांचे समर्थक आणि कार्यकर्ते आहेत. पडळकरांनी तयार केलेल्या चित्रपटाने त्यांच्या चाहत्यांनी या चित्रपटाला प्रतिसाद देत पडळकरांच्या कामाचे कौतुक केलं आहे. चित्रपटात पडळकरांची डॅशिंग एन्ट्री आणि फाईट सिन नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. विशेष म्हणजे या चित्रपटात धनगर नेते पडळकरांसोबत उत्तमराव जानकरही या चित्रपटात दिसत आहे.

दरम्यान, सिनेमा नेमका कधी रिलीज होईल, हे अद्याप सांगण्यात आले नाही. ट्रेलरमध्येही ‘लवकरच’ असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सिनेमा कधी रिलीज होणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

पाहा ट्रेलर :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *