AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशा काळात बॉलिवूड साथ देत नाही..; राजपाल यादव प्रकरणात ज्येष्ठ अभिनेते स्पष्टच म्हणाले

अभिनेता राजपाल यादवच्या चेक बाऊन्स प्रकरणात आता एका ज्येष्ठ अभिनेत्याने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. अशा कठीण काळात बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोक साथ देत नाही, असं ते म्हणाले. बॉलिवूड इंडस्ट्रीचं वास्तव त्यांनी सांगितलं.

अशा काळात बॉलिवूड साथ देत नाही..; राजपाल यादव प्रकरणात ज्येष्ठ अभिनेते स्पष्टच म्हणाले
Govind Namdev and Rajpal YadavImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 13, 2026 | 12:32 PM
Share

चेक बाऊन्सप्रकरणी अभिनेता राजपाल यादव सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर 9 कोटी रुपयांचं कर्ज आहे. हे कर्ज फेडण्यासाठी राजपालने जे चेक दिले होते, ते बाऊन्स झाल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई झाली आहे. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा राजपाल सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा सामना करत आहे. या कठीण काळात बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी त्याची मदत करत आहेत. सलमान खान, सोनू सूद, मिका सिंह यांसारख्या सेलिब्रिटींनी त्याला आर्थिक मदत जाहीर केली आहे. आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायक साकारणारे अभिनेते गोविंद नामदेव यांनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.

‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गोविंद नामदेव म्हणाले, “मी पाहिलंय, जेव्हा बॉलिवूडमध्ये अशाप्रकारची घटना होते, तेव्हा लोक साथ देत नाहीत. असंच होत आलंय आणि पुढेही होत राहील. त्यामागे विचार असतो, संस्कार असतात. ज्यांच्यात मदत करण्याचे संस्कार नसतात, ते कधीच करत नाहीत. इथली हवा त्यांना असं बनवते. खूपच दुर्दैवी आहे हे. राजपालसोबत जे काही झालं, त्याचा मी साक्षीदार आहे. तो अनायसे वाईट काळात अडकला. व्यक्ती म्हणून तो खूप चांगला आहे. यापुढचं त्याचं आयुष्य आणखी चांगलं होईल अशी मी आशा करतो. राजपालसारख्या चांगल्या माणसाला अशा संकटात पाहून मला खूप वाईट वाटतं. अनावधानाने तो या परिस्थितीत अडकला आहे. तो अत्यंत दयाळू आणि प्रेमळ आहे.”

राजपाल यादवच्या जामीन अर्जावर गुरुवारी कोर्टात सुनावणी झाली. परंतु कोर्टाकडून त्याला दिलासा मिळाला नाही. या वादाबाबत राजपालची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो संपूर्ण प्रकरणाबद्दल सांगताना दिसतोय. “मी पैसे घेतले नव्हते, कारण त्यांनी फायनान्सर म्हणून स्वत: पैसे गुंतवले होते. त्यांना त्यांच्या नातवाला हिरो बनवायचं होतं. मी ‘अता पता लापता’ या चित्रपटाचा दिग्दर्शक नव्हतो, ना आहे, ना पुढे राहणार. मी अभिनेता आहे. कधी-कधी 100 मॅच खेळायचे असतात, तर क्रिकेटर 95 मॅच खेळतो आणि 5 मॅच कधी कधी फुटबॉल खेळतो. त्यामुळे आमच्यासाठी हा क्रिएटिव्ह प्रयोग होता,” असं राजपाल म्हणाला होता.

Follow Us
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....