
Govinda and Sunita Ahuja on Divorce: गेल्या कित्येत महिन्यांपासून अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सुनीता हिने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केला असून गोविंदा यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्याची माहिती देखील समोर आली. गोविंदा याने अनेक महिलांसोबत संबंध असल्याचे सुनीता हिने आरोप केले. त्यानंतर लवकरच सुनीता आणि गोविंदा यांचे मार्ग मोकळे होणार अशी सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगली. पण नुकताच गोविंदा आणि सुनीता यांनी घटस्फोटाच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून सुनीता आहुजा आणि गोविंदा एकत्र दिसले नव्हते, परंतु गणपती बाप्पाच्या पूजेनिमित्त दोघेही एकत्र दिसले. कत्र येऊन सुनीता आणि गोविंदाने त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गोविंदा याने पापाराझींना मिठाई वाटली. यावेळी पापाराझींनी गोविंदा आणि सुनीता यांना घटस्फोटाबद्दल विचारलं.. यावर अभिनेता म्हणाला, ‘तुम्ही वाद ऐकण्यासाठी आला आहात की गणपती पाहण्यासाठी? तर कोणतेही वाद नाहीयेत.’ असं स्पष्टीकरण अभिनेत्याने दिलं.
VIDEO | Mumbai: Bollywood actor Govinda celebrates Ganesh Chaturthi with his wife Sunita. Speaking to reporters, the actor said, “There is nothing more special than this. When Lord Ganesha bestows his blessings, the hardships of the family are removed, and sorrow is taken… pic.twitter.com/YjYjR3rmCl
— Press Trust of India (@PTI_News) August 27, 2025
पुढे अभिनेता म्हणाला, ‘यापेक्षा मोठे आशीर्वाद नाही. एका दिवसानंतर सर्वकाही ठिक होतं, सर्व अडथळे दूर होतात. समाजासोबत, आपण सर्वजण एकत्र राहावं अशी प्रार्थना करतो. तुमच्या प्रार्थना आपल्यासोबत असू द्या. विषेशतः माझा मुलगा यश आणि मुलगी टीना हिच्यासाठी प्रार्थना करा… माझ्यापेक्षा कित्येक पटीने चांगलं त्यांचं काम असो… अशी प्रार्थना करा… तुमचं प्रेम कायम माझ्या मुलांसोबत राहूद्या…’ असं देखील गोविंदा म्हणाला.
फेब्रुवारीपासून गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत हे ज्ञात आहे. जेव्हा कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल करण्याची वेळ आली तेव्हा गोविंदाच्या वकिलांनी यावर मौन सोडलं. ‘कोणतीही केस नाही… सर्वकाही ठिक होत आहे, जुन्या गोष्टी काढून त्यावर चर्चा होत आहे..’ असं अभिनेता म्हणाला. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरु आहे…