AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकर स्वतःपेक्षा 20 वर्ष लहान अभिनेत्रीच्या होते प्रेमात, म्हणाले, ‘आजही आठवण येते पण…’

Nana Patekar Personal Life: विवाहित असताना देखील स्वतःपेक्षा 20 वर्ष लहान अभिनेत्रीच्या प्रेमात होते नाना पाटेकर, दोघांच्या लव्हस्टोरीचे किस्से सर्वदूर पसरले होते. ब्रेकअपनंतर नाना पाटेकर म्हणाले, 'आजही तिची आठवण येते...'

नाना पाटेकर स्वतःपेक्षा 20 वर्ष लहान अभिनेत्रीच्या होते प्रेमात, म्हणाले, 'आजही आठवण येते पण...'
फाईल फोटो
| Updated on: Aug 28, 2025 | 1:26 PM
Share

Nana Patekar Personal Life: अभिनेता नाना पाटेकर यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही नाना पाटेकर सिनेविश्वात सक्रिय आहेत. आज नाना पाटेकर अनेकांच्या प्रेरणास्थानी आहेत. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा नाना पाटेकर त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होते. बॉलिवूडमध्ये करीयर करत असताना नाना पाटेकर यांचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडण्यात आलं. ती अभिनेत्री नाना पाटेकर यांच्यापेक्षा तब्बल 20 वर्षांनी लहान होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर ब्रेकअपनंतर खुद्द नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत भावना व्यक्त केल्या होत्या.

नाना पाटेकर यांच्या सोबत ज्या अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मनिषा कोईराला आहे. तेव्हा मनिषा बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात होती. तर नाना पाटेकर हे मोठे स्टार म्हणून उदयास आले होतं. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. नाना पाटेकर यांचं लग्न झालं होत आणि त्यांना एक मुलगा देखील होता. अशा काळात नाना पाटेकर आणि मनिषा यांच्यामध्ये प्रेम बहरलं होतं. दरम्यान, एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी मनिषा कोईराला हिच्याबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. आजही नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.

नाना पाटेकर मुलाखतीत म्हणाले होते, ‘मी मनिषा स्टारर ‘ग्रहण’ सिनेमा पाहिला आहे. सिनेमात ती प्रचंड सुंदर दिसत होती. मनीषाकडे जन्मजात प्रतिभा आहे. ती सर्वात संवेदनशील अभिनेत्री आहे. ती कस्तुरी मृगासारखी आहे, तिला हे लक्षात आलं पाहिजे की तिला कोणाशीही जुळवून घेण्याची गरज नाही. तिच्याकडे सर्व काही आहे आणि ते पुरेसं आहे. जेव्हा मी पाहतो तेव्हा असं वाटतं ही स्वतःसोबत असं काय करत आहे. तेव्हा मी माझे अश्रू रोखू शकत नाही. कदाचित आज मला तिच्याबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार नाही. ती खूप सहजपणे नाराज होते. कदाचित कारण तिने तिच्या मागील नात्यांमध्ये खूप त्रास सहन केला आहे.”

मनिषा बद्दल नाना पाटेकर पुढे म्हणाले, ‘ब्रेकअप आयुष्यातील फार मोठी आणि वेदनादायी गोष्ट आहे… या वेदना समजण्यासाठी तुम्हाला त्या वेदना अनुभवाव्या लागतील… मला मनिषाची आजही आठवण येते…’ सांगायचं झालं तर, नाना पाटेकर आणि मनिषा यांच्या नात्याला आज अनेक वर्ष झाली आहेत. दोघे देखील त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा