Govinda : खरंच लेकीच्या वयाच्या अभिनेत्रीवर जडलाय गोविंदाचा जीव! आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री की पब्लिसिटी स्टंट, सत्य काय?

Govinda : अभिनेता गोविंदा सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदाच्या नावाची चर्चा अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत होत आहे. अशात अभिनेत्याच्या आयुष्यात खरंच प्रेमाची एन्ट्री झाली आहे? की एक पल्बिसिटी स्टंट आहे? याबद्दल मोठं सत्य समोर आलं आहे.

Govinda : खरंच लेकीच्या वयाच्या अभिनेत्रीवर जडलाय गोविंदाचा जीव! आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री की पब्लिसिटी स्टंट, सत्य काय?
अभिनेता गोविंदा
| Updated on: Aug 13, 2026 | 11:42 AM

Govinda : ‘प्यार हम दोनों ने किया… मगर तड़पना सिर्फ मेरे नसीब में आया’ आणि ‘अरे पगली, प्यार से डर कैसा?’, असे एकापेक्षा एका डायलॉगने प्रेक्षकांना प्रेमाची भाषा शिकवणारा गोविंदा आता खरंच प्रेमामुळे चर्चे आला आहे. वयाच्या 62 व्या वर्षी गोविंदा त्याच्या पोटच्या मुलीच्या प्रेमात असल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. दोघांना विमानतळावर एकत्र स्पॉट करण्यात आलं. त्यामुळे अभिनेत्याच्या आयुष्यात खरंच प्रेमाची एन्ट्री झाली आहे का? की फक्त अफवा आहे? यावर गोविंदा आणि कोमल यांच्याकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तर अभिनेत्याची पत्नी सुनीता अहुजा हिने प्रकरणावर परखड प्रतिक्रिया दिली आहे.

कोलम आणि गोविंदा यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे दोघांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याआधी देखील गोविंदाच्या बोयकोने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहे. एवढंच नाही तर, गोविंदा आणि कोमल यांच्या नात्यावर रंगलेल्या चर्चांवर देखील सुनिता हिने स्पष्ट उत्तर दिलं. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी…’, असं सुनिता म्हणाली. शिवाय गोविंदाच्या निवडीला तिने विचित्र… असं सांगितलं.

सुनीना म्हणालेली, ‘जेव्हा मी बोलत होती, तेव्हा लोकांनी मला ट्रोल केलं. आता मी असं वाटतं की गोविंदाच्या चाहत्यांनी यावर उत्तर दिलं पाहिजे. आता याचं उत्तर कोणी माझ्याकडून मागायचं नाही. मला यामध्ये कोणत्याच प्रकारचा रस नाही…’, असं देखील गोविंदाची पत्नी म्हणाली.

कोमल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘गोविंदाच्या आगामी ‘रुपा’ या सिनेमाशी जोडली जाण्यापूर्वी कोमल विशेष चर्चत नव्हती. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. कोमलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, शिक्षणाबद्दल आणि कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दलची माहिती सार्वजनिक स्रोतांमध्ये मर्यादित आहे. गोविंदाच्या आगामी ‘रुपा’ या सिनेमाशी जोडली जाण्यापूर्वी कोमल विशेष चर्चत नव्हती. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. कोमलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, शिक्षणाबद्दल आणि कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दलची माहिती सार्वजनिक स्रोतांमध्ये मर्यादित आहे.

कोमल हिच्याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. पण सोशल मीडियावर कोमल कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर कोमल कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. पण आता कोमल अभिनेता गोविंदा याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. पण दोघे खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही नाही? याबद्दल कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us