‘त्या’ काळी माझ्या दोन पत्नी ! फोटो शेअर करत गोविंदाने केला धक्कादायक खुलासा, दुसऱ्या पत्नीचं नाव..

Govinda : अभिनेता गोविंदाने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला. 80-90 च्या दशकापासून आपल्या दोन बायका होत्या, असंही त्याने उघड केलं. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

त्या काळी माझ्या दोन पत्नी ! फोटो शेअर करत गोविंदाने केला धक्कादायक खुलासा, दुसऱ्या पत्नीचं नाव..
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 10, 2023 | 3:22 PM

Govinda Second Wife : अभिनेता गोविंदा बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. 80 आणि 90 च्या दशकात एकाहून एक सरस चित्रपट देत गोविंदाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. डान्स, कॉमेडी आणि इमोशनल सीन्सचा बादशहा असणाऱ्या गोविंदाचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. गेल्या अनेक वर्षांपासून तो चित्रपटांपासून दूर असला तरी अनेकदा टीव्ही रिॲलिटी शो आणि फिल्मी इव्हेंट्समध्ये गोविंदा सहभागी होत असतो.

असा हा हरहुन्नरी अभिनेता अलीकडेच रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत कुटुंबासोबत स्पॉट झाला होता. गोविंदाने आता या दिवाळी पार्टीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि त्यात एक धक्कादायक खुलासाही केली. मला दोन बायका आहेत, असे गोविंदाने त्या फोटोद्वारे शेअर केले. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

गोविंदाची दुसरी पत्नी आहे तरी कोण ?

गोविंदा नुकताच रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत कुटुंबियांसह सहभागी झाला होता. या पार्टीत दिग्दर्शक डेव्हिड धवनही आले होते. त्यावेळी गोविंदा आणि डेव्हिड धवन यांची एकदम प्रेमाने भेट झाली आणि त्यांनी एकत्र अनेक फोटोही काढले. त्या दोघांमध्ये असलेल्या भांडणाच्या चर्चेलाही या फोटोंमुळे पूर्णविराम मिळाला. त्यानंतर गोविंदाने या पार्टीतील डेव्हिडसोबतचा त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि एक मजेदार कॅप्शनही लिहिले आहे.

खरंतर गोविंदाने डेव्हिड धवनसोबतचा फोटो शेअर करत लिहीलं की ,” 80 आणि और 90 च्या दशकात माझ्या दोन पत्नी होत्या. एक सुनीता आणि एक डेव्हिड.” गोविंदाची ही मजेशीर पोस्ट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

 

डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन, तसेच अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी गोविंदा आणि डेव्हिडच्या फोटोवर प्रेमाचा, लाइक्सचा वर्षाव केला आहे. डेव्हिड आणि गोविंदा यांनी पुन्हा एकत्र काम करावं अशी इच्छाही अनेक चाहत्यांनी व्यक्त केली आहे. गोविंदाने याच दिवाळी पार्टीतील पत्नी सुनितासोबतचा एक सुंदर फोटोही शेअर केला.

 

गोविंदा – डेव्हिड धवनने 17 चित्रपटात केलं एकत्र काम

गोविंदा आणि डेव्हिड धवनच्या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये कुली नंबर 1, हिरो नंबर 1, शोला और शबनम, राजा बाबू, आँखे आणि पार्टनर सारख्या आयकॉनिक चित्रपटांचा समावेश आहे. या जोडीने 17 चित्रपट एकत्र केले आहेत. पण नंतर दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.