AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda: पत्नी सुनीतासोबतचा वाद अन् अचानक गोविंदा हॉस्पिटलमध्ये; नेमकं काय झालं?

Govinda: एकीकडे पत्नी सुनीता अहुजासोबत कौटुंबिक वाद सुरू असताना अभिनेता गोविंदा आता रुग्णालयात पोहोचला आहे. त्यामुळे त्याच्या तब्येतीबद्दल चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. गोविंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Govinda: पत्नी सुनीतासोबतचा वाद अन् अचानक गोविंदा हॉस्पिटलमध्ये; नेमकं काय झालं?
गोविंदाImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 23, 2026 | 6:54 AM
Share

अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी सुनीता अहुजासोबतच्या नात्यातील तणाव, घटस्फोटाची चर्चा आणि कथित दुसऱ्या लग्नाच्या दाव्यांदरम्यान आता गोविंदा मुंबईतील जुहू इथल्या एका रुग्णालयाबाहेर दिसला. शनिवारी हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये त्याच्या प्रकृतीबाबत चिंता निर्माण झाली. यावेळी पापाराझींनी गोविंदाला पाहताच त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्याने तोंडाला मास्क लावलेला होता. मात्र त्याने चाहत्यांची चिंता वाढू न देता “मी ठीक आहे” असं सांगितलं. परंतु घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान गोविंदाचं हॉस्पिटलमध्ये जाण्याचं नेमकं कारण अद्यार समोर आलेलं नाही. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना गोविंदा नेहमीप्रमाणे शांत दिसत होता. त्याने पापाराझी आणि माध्यमांशी फारसं बोलणं टाळलं. तब्येतीबाबत विचारण्यात आल्यानंतर त्याने आपण ठीक असल्याचं सांगितलं.

गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या नात्याबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चे सुरू आहेत. सुनीता यांनी राखी सावंतसोबत फोनवर बोलताना दावा केला होता की गोविंदा दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होता. अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत लग्नाची योजना असल्याचंही तिने म्हटलं होतं. याच कारणामुळे मी घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याचं सुनीताने स्पष्ट केलं. मात्र गोविंदाच्या मॅनेजरने हे आरोप ठामपणे फेटाळले आहेत. गोविंदाने दुसरं लग्न करण्याचा कोणताही प्रश्न नाही आणि तो तसं काहीही करत नसल्याचं मॅनेजरने स्पष्ट केलं. गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक दावे समोर येत असले तरी त्याने स्वत: या सर्व चर्चांवर अद्याप सविस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही.

पहा व्हिडीओ-

काय म्हणाला मॅनेजर?

सुनीताने गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाबाबत केलेल्या दाव्यांवर प्रतिक्रिया देताना गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा यांनी हे आरोप फेटाळून लावले. गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाची कोणतीही चर्चा कधीच झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गोविंदा सध्या पूर्णपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. याशिवाय जर गोविंदाला सुनीतासोबत नातं संपवायचं असतं, तर त्याने स्वत: घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली असती, असंही मॅनेजरने म्हटलं. सुनीता यांनीच घटस्फोटाचा खटला दाखल करून नंतर तो मागे घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दोघांनीही मुलांच्या भविष्यासाठी मतभेद बाजूला ठेवून नातं सुधारावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु