ऋषभ पंतकडून संगीताचा अपमान? हंसल मेहता यांनी केली जाहिरात हटवण्याची मागणी

| Updated on: Dec 11, 2022 | 12:28 PM

ऋषभ पंतची नवी जाहिरात वादाच्या भोवऱ्यात; नेटकऱ्यांकडून का होतेय टीका?

ऋषभ पंतकडून संगीताचा अपमान? हंसल मेहता यांनी केली जाहिरात हटवण्याची मागणी
दिग्दर्शक हंसल मेहता, क्रिकेटर ऋषभ पंत
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: टीम इंडियाचा क्रिकेटर ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कोणत्याही अभिनेत्रीसोबतच्या लिंक-अपमुळे नाही तर त्याच्या एका जाहिरातीमुळे तो चर्चेत आला आहे. ऋषभ पंत एका नव्या जाहिरातीमुळे वादात सापडला आहे. या जाहिरातीत त्याने संगीताचा अपमान केला, असा आरोप अनेकांकडून होत आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनीसुद्धा ऋषभच्या जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली आहे.

हंसल मेहता का भडकले?

क्रिकेटर ऋषभ पंतच्या ड्रीम 11 च्या एका नव्या जाहिरातीला पाहिल्यानंतर अनेकजण निराश झाले. या जाहिरातीत ऋषभ म्हणतो की, जर मी क्रिकेटर झालो नसतो तर.. त्यानंतर तो एका संगीतकाराच्या वेशभुषेत एण्ट्री करतो. मात्र अत्यंत बेसूर गात तो म्हणतो, नशिब मी माझं स्वप्न पूर्ण करू शकलो.

हे सुद्धा वाचा

ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेकांनी टीका केली की ऋषभ पंतने त्यात भारतीय संगीताचा अपमान केला. अनेकजण त्यावर कमेंट करत राग व्यक्त करत आहेत. दिग्दर्शक हंसल मेहता यांनीसुद्धा ट्विट करत लिहिलं, ‘ही अत्यंत वाईट आणि अपमानकारक जाहिरात आहे. स्वत:चं प्रमोशन करा पण कला आणि संस्कृतीला कमी लेखून नाही. मी या जाहिरातीला हटवण्याची मागणी करतो.’

ऋषभच्या या जाहिरातीवर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ऋषभच्या काही चाहत्यांना ही जाहिराती मनोरंजक वाटली, तर अनेकांनी त्यावर संगीताचा अपमान केल्याचा आरोप केलाय.

ऋषभ अनेकदा अभिनेत्री उर्वशी रौतेलामुळे चर्चेत असतो. एकेकाळी हे दोघं डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र आता दोघंही एकमेकांवर टीका करण्याची किंवा खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडत नाहीत.