Hansika Motwani : ‘मला पश्चाताप..’ घटस्फोटानंतर हंसिका मोटवानीने सोडलं मौन, म्हणाली – माझं कुटुंब..

Hansika Motwani On Divorce : अभिनेत्री हंसिका मोटवानी हिचा नुकताच सोहेल कथूरियाशी घटस्फोट झाला. वैयक्तिक जीवनातील या घडामोडींनंतर हंसिका पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलली असून घटस्फोटाचा पश्चाताप होतो का, यावर तिने मनातलं सगळंच सांगून टाकलं आहे.

Hansika Motwani : मला पश्चाताप.. घटस्फोटानंतर हंसिका मोटवानीने सोडलं मौन, म्हणाली - माझं कुटुंब..
हंसिका मोटवानी
Image Credit source: social media
| Updated on: Apr 17, 2026 | 11:28 AM

आधी बालकलाकार म्हणून तर नंतर अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर आलेली हंसिका मोटवानी ही गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. लग्नाच्या 3 वर्षानंतर अभिनेत्री हंसिकाने वेगळं होण्याचा निर्णय घेत नवऱ्याशी घटस्फोट घेतला. मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने 11 मार्च 2026 रोजी हंसिका मोटवानी आणि व्यावसायिक सोहेल कथुरिया या दोघांना परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर केला. अवघ्या तीन वर्षांपूर्वीच, म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये या दोघांचा भव्य विवाहसोहळा पार पजला होता, मात्र परस्पर मतभेदांमुळे जुलै 2024 पासून ते दोघेही वेगवेगळे राहत होते. आता त्यांचा कायदेशीररित्या, अधिकृतरित्या घटस्फोट झाला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान हंसिकाने मौन राखलं होतं, मात्र आता घटस्पोटानंर महिन्याभराने तिने या विषयावर तिचं मतं मांडत भाष्य केलं आहे.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हंसिका मनमोकळेपणाने बोलली. प्रेमामुळे कधी त्रास झालाय का तसंच लग्न आणि पुन्हा प्रेमात पडण याबद्दल तिने तिची मतं मांडली आहेत. घटस्फोटानंतरच्या काळात कुटुंबियांची, घरच्यांची खूप साथ मिळाल्याचे तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं.

मला पश्चाताप वाटत नाही

असं असलं तरी हंसिकाने घटस्फोटावर थेट भाष्य केलं नाही, पण अलीकडेच ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले. हंसिका म्हणाली, “माझे कुटुंब माझ्यावर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकत नाही. लोकांना खळबळजनक बातमी हवी होती आणि ती त्यांना मिळाली. मी याबद्दल कधीही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि देणारही नाही, कारण मला त्याची पर्वा नाही. सगळं ठीक आहे. मला कोणताही पश्चात्ताप नाही. जर तुम्ही चुकीच्या गाडीत बसलात, तर त्रास सहन करण्यापेक्षा त्यातून खाली उतरणंच बरं असंत. त्यामुळेच, सगळं ठीक आहे, काहीच अडचण नाही. मला माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. मला कोणताही पश्चात्ताप नाही. मी जिथे आहे तिथे खूप आनंदी आहे” अशा शब्दांत हंसिकाने घटस्फोटाबद्दल भाष्य केलं. त्या निर्णयाचा पश्चाताप नसल्याचं तिने या विधानांवरून सूचित केलं आहे.

लग्न, मातृत्व याबद्दल काय म्हणाली हंसिका ?

यावेळी बोलताना हंसिकाने लग्न आणि मातृत्व यांबाबतच्या सामाजिक अपेक्षांवरही भाष्य केलं. महिलांवर ठराविक वेळेत सर्व होण्याची मर्यादा का लादली जाते, असा सवालही तिने उपस्थित केला. पुढे ती म्हणाली, “मला माहीत नाही… माझ्या बाबतीत असं कधी घडलं नाही. तू या वयाची झाली आहेत, आता तुझं लग्न व्हायला हवं, असं म्हणत लोकांनी मला कधीच एका चौकटीत बसवलं नाही” असं हंसिकाने सांगितलं. ‘तुम्ही काय केलं पाहिजे, याबद्दल आजकाल अनेक लोक तुम्हाला सल्ला देतात. पण आजच्या मुली इतक्या सक्षम आणि स्वतंत्र आहेत की, त्या स्वतःसाठी जे योग्य असेल, तेच करतात” असं हंसिताने नमूद केलं. “पूर्वी लोक म्हणायचे, 25 व्या वर्षी लग्न करा, मग 30 व्या वर्षी, आता 40 व्या वर्षी म्हणतात.’ हे लोक कोण आहेत? लग्नानंतरही ते म्हणतात, ‘आता मूल जन्माला घाला.’ पण जर तुम्हाला ते योग्य वाटत नसेल, तर करू नका. एवढा दबाव का घ्यायचा?” असा सवालही तिने विचारला.

 

Follow Us