AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Box Office: ‘हनुमान अंश’चा 40 व्या दिवशीही चमत्कार, नीम करोली बाबांचे आशीर्वाद सदैव

Hanuman Ansh Box Office : फार कमी बजेटमध्ये तयार झालेल्या 'हनुमान अंश' सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. प्रदर्शनानंतर 40 व्या दिवशी देखील 'हनुमान अंश' सिनेमा बक्कळ कमाई करत आहे.

Box Office: 'हनुमान अंश'चा 40 व्या दिवशीही चमत्कार, नीम करोली बाबांचे आशीर्वाद सदैव
| Updated on: Sep 16, 2026 | 11:43 AM
Share

Hanuman Ansh Box Office : ‘हनुमान अंश’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कोणतीही मोठी स्टार-कास्ट किंवा जोरदार जाहिरातबाजी न करता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हळूहळू आपली पकड मजबूत करत आहे. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा सिनेमा अवघ्या 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला. ही रक्कम इतकी कमी आहे की, आजकालचे सुपरस्टार अनेकदा केवळ आपल्या सिनेमांच्या जाहिरातींवरच यापेक्षा जास्त खर्च करतात. मंगळवार जो भगवान हनुमानाला समर्पित दिवस मानला जातो, तो ‘हनुमान अंश’साठी खरोखरच शुभ ठरला. प्रदर्शनाच्या 40 व्या दिवशीही या सिनेमाने दमदार कमाई केली. अभिनेत्री शोभिनव सत्या यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आता बॉलीवूडमधील सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा ठरला आहे. 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर 300 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचला आहे.

गेल्या मंगळवारी म्हणजेच प्रदर्शनाचा 40 वा दिवस ‘हनुमान अंश’ला नीम करोली बाबांचा प्रचंड आशीर्वाद लाभला. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या व्यापार रिपोर्टनुसार, बॉक्स ऑफिसवर सिनेमाने 40 व्या दिवशीही म्हणजे सहाव्या मंगळवारी जबरदस्त कामगिरी केली.

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 40 व्या दिवशी ”हनुमान अंश” या सिनेमाने देशभरात सुमारे 9 हजार 765 शोसह 9.25 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. सहाव्या आठवड्यात देखील बॉक्स ऑफिसवर कायम असलणाऱ्या या सिनेमासाठी ही आकडेवारी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. यासह, भारतातील सिनेमाचे एकूण नेट कलेक्शन 231.कोटी रुपये आणि एकूण ग्रॉस कलेक्शन 272.90 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

फक्त भारतातच नाही परदेशातील बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाचा जलवा कायम आहे. ओव्हरसीज मार्केटमध्ये 40 व्या दिवशी चित्रपटाने 2.00 कोटी रुपये कमावले, ज्यामुळे त्याचे एकूण ओव्हरसीज ग्रॉस 18.50 कोटी रुपये झाले आहे.

‘हनुमान अंश” चं वर्ल्डवाईड ग्रॉस कलेक्शन 291 कोटी रुपयांच्या जादूई आकड्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे आणि लवकरच हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी सज्ज आहे. नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘हनुमान अंश’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था