हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट, दुसऱ्या पुरुषासोबत व्हिडीओ पोस्ट करत नताशा म्हणाली…

Natasa Stankovic Video: हार्दिक पांड्यायाच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर कसं आयुष्य जगतेय नताशा? दुसऱ्या पुरुषासोबत अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल, कोण आहे 'तो'? व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली....

हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट, दुसऱ्या पुरुषासोबत व्हिडीओ पोस्ट करत नताशा म्हणाली...
| Updated on: Feb 10, 2025 | 2:29 PM

Natasa Stankovic Video: अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांचा घटस्फोट झाला आहे. 2024 मध्ये नताशा आणि हार्दिक यांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. घटस्फोटानंतर नताशा आणि हार्दिक त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या देखील दुसऱ्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. दरम्यान, नताशा हिचा देखील एका पुरुषासोबत व्हिडीओ व्हायरल होत आहे.

खुद्द नताशा हिने व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. नताशा हिच्यासोबत दिसणारा पुरुष दुसरा तिसरा कोणी नसून जवळचा मित्र अलेक्झांडर ॲलेक्स इलिक आहे. आता नताशा आणि अलेक्झांडर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे वर्कआउट करताना दिसत आहेत.

 

 

नताशा आणि अलेक्झांडर अनेकदा एकत्र दिसतात. पार्टीपासून वर्कआउटपर्यंत, त्यांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असतात. आता नताशा आणि अलेक्झांडरचे वर्कआउट व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओपोस्ट करत नताशा हिने कॅप्शनमध्ये ‘फ्राय डे फन डे’ असं लिहिलं आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी नताशा आणि अलेक्झांडर यांचं एकमेकांसोबत नातं जोडत आहेत. तर अनेक जण दोघांच्या फिटनेस रुटिनचं कौतुक करत आहेत. नताशाच्या लूकबद्दल सांगायचं झालं तर, तिने काळ्या रंगाचा जिम आउटफिट परिधान केला आहे. अलेक्झांडर निळ्या रंगाच्या जिमवेअरमध्ये दिसत आहे.

कोण आहे अलेक्झांडर?

अलेक्झांडर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो एक फिटनेस कोच आहे. शिवाय अभिनेता आणि मॉडेल देखील आहे. अलेक्झांडर याला अनेकदा अभिनेत्री दिशा पाटनी हिच्यासोबत देखील स्पॉट करण्यात आलं आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत.

नताशा आणि हार्दिक

नताशा आणि हार्दिक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी 2020 मध्ये लग्न केलं. दोघांचं लग्न अगदी साधेपणाने झाले. त्यानंतर 2022 मध्ये हार्दिक आणि नताशाचे डेस्टिनेशन वेडिंग झालं होतं. ज्यामध्ये त्यांचा मुलगा अगस्त्यही होता. नताशा आणि हार्दिकच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.