
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ जगभरात प्रसिद्ध आहे. अनेकदा असं म्हटलं जातं की जगात एकसारखे चेहरे असलेले सात लोक असतात. कतरिनाच्या बाबतीत हे सत्य ठरतंय, मात्र आम्ही तुमच्यासाठी एक व्यक्ति घेऊन आलोय. होय, तिचे नाव आहे एलिना राय, ती सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे.

एलिना रायनं अद्याप चित्रपटांत पदार्पण केलेलं नाही, मात्र ती एक उत्तम फॅशन ब्लॉगर आहे. ती मुंबईत राहते.

कॅटरिना कैफ सारख्या दिसणाऱ्या एलिना रायला लाखो लोक फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर तिनं आत्तापर्यंत 187 पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावर लोक एलिनावर प्रचंड प्रेम करतात. तिचे सुंदर फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

बर्याच वेळा कतरिनाचे चाहते चुकून एलिनाच्या पोस्टवर पोहोचतात. नंतर जेव्हा त्यांना त्यांची चूक समजते, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं.

कतरिना कैफ प्रमाणे एलिनाही फिट राहण्यासाठी स्वतःची खूप काळजी घेते.