“तो म्हातारा म्हणाला, संधी मिळाली तर मुलीसोबतही..”; रतन राजपूतचा धक्कादायक खुलासा

| Updated on: Sep 23, 2022 | 7:17 PM

कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला खुलासा

तो म्हातारा म्हणाला, संधी मिळाली तर मुलीसोबतही..; रतन राजपूतचा धक्कादायक खुलासा
रतन राजपूतचा धक्कादायक खुलासा
Image Credit source: Instagram
Follow us on

टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत (Ratan Rajput) नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी चर्चेत असते. कोरोना लॉकडाऊनच्या काळात रतनने स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं. ज्यावर ती व्लॉगच्या रूपात तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत होती. रतनने तिच्या नुकत्याच एका व्लॉगमध्ये बॉलिवूडमध्ये होत असलेल्या कास्टिंग काऊचबाबत (Casting Couch) धक्कादायक खुलासा केला. 14 वर्षांपूर्वी एका 60 ते 65 वर्षांच्या निर्मात्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली, असं रतनने सांगितलं.

“आज मला मुंबईत येऊन 14 वर्षे पूर्ण झाली. मी मुंबईत आले तेव्हा एका 60 ते 65 वर्षांच्या निर्मात्याने माझा खूप अपमान केला होता. तुझे केस बघ, तुझी त्वचा बघ, तू कसे कपडे घालतेस ते बघ, तुला तुझा संपूर्ण लूकच बदलावा लागेल, असं म्हणत त्याने मला हिणवलं. तो मला म्हणाला, तुझ्या मेकओव्हरसाठी 2 ते अडीच लाख रुपये खर्च येईल. पण मी पैसे का खर्च करू? जर तुला मी पैसे खर्च करावं असं वाटत असेल तर मला तुझा गॉडफादर बनव. हा निर्माता इतका निर्लज्ज होता की त्याने मला सांगितलं, जर संधी मिळाली तर तो त्याच्या मुलीसोबतही झोपला असता,” असं रतन तिच्या व्लॉगमध्ये म्हणाली.

तो अनुभव सांगताना ती पुढे म्हणाली, “मी ते सर्व ऐकून खूप घाबरले होते. मी त्यांना म्हणाले की तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. मी तुमची मैत्रीण कशी होऊ शकते? त्यानंतर त्या व्यक्तीला राग आला. मी तुझ्यासाठी फुकट काही करणार नाही, असं तो म्हणाला. अभिनयविश्वात यायचं असेल तर हे सगळं नाटक करणं बंद कर, असं त्याने सुनावलं.”

हे सुद्धा वाचा

“तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, असं जेव्हा मी म्हणाले तेव्हा त्या व्यक्तीला माझा खूप राग आला. रागाच्या भरात तो मला म्हणाला, माझी मुलगी अभिनेत्री झाली असती तर मी तिच्यासोबतही झोपलो असतो. हे ऐकून मला धक्काच बसला. आपल्या मुलीला कोणी असं कसं म्हणू शकतं? आजही मला ती व्यक्ती समोर दिसली तर तोंडावर चप्पल फेकून मारावंसं वाटतं,” असं तिने पुढे सांगितलं.

रतनने या घटनेनंतर कोणत्याही चित्रपटात भूमिका मिळवण्याचे प्रयत्न थांबवले. या व्लॉगमध्ये तिने इंडस्ट्रीत संघर्ष करणाऱ्यांना कधीही तडजोड करू नका असा सल्लाही दिला.