धर्मेंद्र यांच्यासाठी भावनिक पत्र… पूर्णपणे कोलमडलेल्या हेमा मालिनी यांना स्वतःला सावरणं कठीण… तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Dharmendra 90th Birthday : तुम्ही माझं हृदय तोडून गेलात... मी आता हळू हळू... धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पूर्णपणे कोलमडलेल्या हेमा मालिनी यांचं पतीला भावनिक पत्र.... तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

धर्मेंद्र यांच्यासाठी भावनिक पत्र... पूर्णपणे कोलमडलेल्या हेमा मालिनी यांना स्वतःला सावरणं कठीण... तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Actress Hema Malini
| Updated on: Dec 08, 2025 | 1:43 PM

Dharmendra 90 Birthday : “अगर तकदीर में मौत लिखी है तो कोई बचा नहीं सकता, अगर जिंदगी लिखी है तो कोई माई का लाल मार नहीं सकता’.” दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचा हा डायलॉग फार लहान आहे, पण अर्थ मात्र फार मोठा आहे… धर्मेंद्र यांनी त्यांच्या चाहत्यांना कायम जगण्याची प्रेरणा दिली. पण एक दिवस असा आला जेव्हा धर्मेंद्र चाहत्यांच्या रडवून गेले… 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला आणि चाहत्यांनी त्यांचा हिरो गमावला… धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस आहे… देशातील प्रत्येक कोपऱ्यातून चाहते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर आयुष्यातील सर्वात जवळचा व्यक्ती गमावल्यामुळे अभिनेत्री हेमा मालिनी पूर्णपणे कोलमडल्या आहे… लग्नानंतर पहिल्यांदा अशी वेळ आली जेव्हा धर्मेंद्र त्यांच्यासोबत नाही… मनातील दुःख हेमा मालिनी यांनी पत्रातून व्यक्त केलं आहे.

हेमा मालिनी यांनी एक्स (ट्विटर) वर शेअर केलेलं पत्र…

माझ्या प्रिय मनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा….

दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे, तुम्ही माझं हृदय तोडून गेलात… आता हळू हळू ते तुकडे गोळा करत आहे आणि पुन्हा आयुष्यात स्वतःला सावण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही नेहमीच माझ्यासोबत आत्म्याने आहात… हे मला माहिती आहे.. आपल्या एकत्र आयुष्यातील आनंदी आठवणी कधीही पुसल्या जाऊ शकत नाहीत आणि त्या क्षणांना पुन्हा जगल्याने मला अपार शांती आणि आनंद मिळतो.

आपण एकत्र घालवलेल्या सुंदर वर्षांसाठी, आपल्या दोन सुंदर मुलींसाठी ज्यांनी आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम बळकट केलं आणि माझ्या हृदयात कायम राहणाऱ्या सर्व सुंदर, आनंदी आठवणींसाठी मी देवाचे आभार मानते.

 

 

तुमच्या वाढदिवशी, तुमच्या नम्रतेसाठी, हृदयातील दयाळूपणासाठी आणि मानवतेसाठीच्या प्रेमासाठी… तुम्ही शांती आणि आनंदाला पात्र आहात ती देव तुम्हाला देवो अशी मी प्रार्थना करतो. माझे प्रिय, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपण एकत्र घालवलेल्या या आनंदी क्षणांना जपून ठेवूया….

असं म्हणत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत दोन फोटो पोस्ट केले आहे. पहिल्या फोटोमध्ये हेमा मालिनी लाल रंगाच्या साडीत दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये हेमा मालिनी स्वतःच्या हाताने धर्मेंद्र यांना पेढा भरवताना दिसत आहेत. सध्या हेमा मालिनी यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.