
बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. धर्मेंद्र मागील काही दिवसांपासून सतत आजारी होते. मुंबईतील प्रसिद्ध रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आणि त्यांच्यावर घरीच उपचार केली जात होती. यादरम्यान अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत असून आता देवावर सर्वकाही सोडल्याचे सांगितले. धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. मात्र, त्यांचे निधन झाल्याचे आणि त्यांच्यावर कुठे अंत्यसंस्कार करणार याबद्दलची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. धर्मेंद्र यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या निधनाबद्दल लपवण्यात आले. हेच नाही तर आपल्या लाडक्या अभिनेत्याचा शेवटचा फोटोही कोणाही बघायला मिळाला नाही.
धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने अत्यंत गुप्तता पाळली. त्यानंतर आता जोरदार टीका केली जात आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हमद अल रेयामी यांनी हेमा मालिनी यांची भेट घेतली. हेमा मालिनी यांच्या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत नेमका काय संवाद झाला आणि संपूर्ण स्थिती काय आहे हे त्यांनी सांगितले. हेमा मालिनी यांच्यासोबतचा एक फोटोही त्यांनी शेअर केला.
हमद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, मी हेमा मालिनी यांच्यासोबत संवाद साधत होतो. पण त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. अश्रू लपवण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू होते. त्यांनी थोडे थांबून मला म्हटले की, काश त्यांच्यासोबत मी त्यादिवशी फार्महाऊसवर असते… जिथे दोन महिन्यांपूर्वी मी त्यांच्यासोबत होते.. काश मी तिथे त्यांना बघू शकले असते… हे बोलताना हेमा मालिनी यांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते.
हेमा मालिनी यांनी हमद यांच्यासोबतच्या संवादात फॉर्महाऊसचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, दोन महिन्यांपूर्वी मी तिथे होते. पण काश मी तिथे त्यांना बघू शकले असते. त्यादिवशी मी फॉर्महाऊसवर असायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे हेमा मालिनी यांच्या मनात अखेर कोणती खंत राहिली, यावर चर्चा रंगताना दिसत आहे. असे सांगितले जाते की, धर्मेंद्र हे आपल्या पहिल्या पत्नी प्रकाश काैर यांच्यासोबत जास्त वेळ फॉर्महाऊसवर घालवत.